सीरियात इसिसचा धुमाकूळ, बॉम्ब हल्ल्यात 40 हून अधिक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 21:31 IST2016-07-27T21:31:10+5:302016-07-27T21:31:10+5:30

इसिसनं केलेल्या दोन बॉम्ब हल्ल्यात जवळपास 44 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त बीबीसीनं दिलं

More than 40 people killed in Syria's bomb blast, bomb attacks | सीरियात इसिसचा धुमाकूळ, बॉम्ब हल्ल्यात 40 हून अधिक जण ठार

सीरियात इसिसचा धुमाकूळ, बॉम्ब हल्ल्यात 40 हून अधिक जण ठार

ऑनलाइन लोकमत

दमस्कस, दि. 27 - कुर्दीश सिटी येथे झालेल्या इसिसनं केलेल्या दोन बॉम्ब हल्ल्यात जवळपास 44 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त बीबीसीनं दिलं आहे. सीरियातील कामिशली या प्रांतात हे बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत.

इसिसच्या या विघातक बॉम्ब हल्ल्यात कुर्दीश लष्करावर हे दोन्ही हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात कुर्दीश सुरक्षा सेनेचे काही अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. इसिसनं एक हल्ला शहरात केला असून, दुसरा हल्ला शहराबाहेरील कुर्दीश सेनेच्या चौकीवर केला आहे.

कामिशली हा भूभाग कुर्द यांच्या अधिपत्याखाली असल्यानं या भागात इसिसकडून सातत्यानं हल्ले होत असतात.

Web Title: More than 40 people killed in Syria's bomb blast, bomb attacks