चीनमध्ये रोज उगवणार चंद्र; चंद्रकोरेचा खेळच संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:40 AM2018-10-20T06:40:33+5:302018-10-20T06:40:46+5:30

बीजिंग : विजेची बचत करण्यासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. चीनने मात्र मानवनिर्मित चंद्रामार्फत विजेचा प्रश्न सोडविण्याचे ठरवले आहे. ...

The moon will rise every day in China; Chandrorek's game ends | चीनमध्ये रोज उगवणार चंद्र; चंद्रकोरेचा खेळच संपणार

चीनमध्ये रोज उगवणार चंद्र; चंद्रकोरेचा खेळच संपणार

googlenewsNext

बीजिंग : विजेची बचत करण्यासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. चीनने मात्र मानवनिर्मित चंद्रामार्फत विजेचा प्रश्न सोडविण्याचे ठरवले आहे. एका शहरात रस्त्यांवरील दिव्यांच्या जागी आकाशात सोडण्यात येणारा चंद्रच उजेड देणार आहे.


‘पीपल्स डेली’ या चीनमधील प्रमुख वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने असे तीन चंद्र तयार करण्याचे ठरविले आहे. ते तिन्ही चंद्र आपल्या नैसर्गिक चंद्रापेक्षा आठपट अधिक उजेड देणारे असतील. चेंगडू या शहरात रस्त्यांवरील दिव्यांनी मिळणारा प्रकाश या चंद्रांद्रारे मिळेल, असे सिचुआन प्रांतातील एरोस्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनचे वू चुनफेंग यांनी ही माहिती दिली. अवकाश संशोधन करणारी ही संस्था आहे. मानवनिर्मिती तीन चंद्रांमुळे चेंगडूमधील १० ते ८० किलोमीटरच्या परिसरात लख्ख प्रकाश पडू शकेल. रस्त्यांवरील दिव्यासाठी लागणारी वीज आणि खर्च यात बचत करणे, हा या प्रयोगामागील हेतू आहे. या चंद्रांमुळे दरवर्षी २४ कोटींची बचत होईल; पण या चंद्रांसाठी किती खर्च येईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. येत्या दोन वर्षांत हे चंद्र अवकाशात सोडण्यात येणार आहेत.


काय आहेत हे चंद्र ?
हे चंद्र म्हणजे प्रत्यक्षात उपग्रहच असतील. त्या उपग्रहांवर आरशाप्रमाणेच परावर्तित होणाऱ्या वस्तूपासून एक आवरण असेल. त्यामुळे उपग्रहांच्या पृष्ठभागांवरील उजेड वा प्रकाश पृथ्वीपर्यंत येईल.
ते उपग्रह वा चंद्र पृथ्वीपासून, म्हणजे प्रत्यक्षात चेंगडू शहरापासून ५00 किलोमीटर अंतरावर स्थिरावतील. त्यामुळे त्यांचा उजेड ठराविक भागांतच पोहोचेल. हा प्रयोग यशस्वी झाला तर ही मोठीच क्रांती ठरू शकेल.

Web Title: The moon will rise every day in China; Chandrorek's game ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन