शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोजतबा खामेनेई इराणचा नवा 'सुप्रीम लीडर'! असेंबली ऑफ एक्सपर्टच्या गुप्त बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 08:03 IST

इराणच्या असेंबली ऑफ एक्सपर्टने बुधवारी माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र मोज्तबा खमेनी यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली.

मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. आता इराणमध्ये त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, काल याबाबत एक्सपर्ट असेंबलीने मोजतबा खामेनेई यांची देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली. इराण इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, ही निवड शक्तिशाली इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या दबावाखाली करण्यात आली.

आखाती देशांकडील डिफेन्स मिसाईल संपली? ब्लूमबर्गच्या रिपोर्टवरून खळबळ; UAE आणि कतारने दिले चोख प्रत्युत्तर, कायदेशीर कारवाईची धमकी

इराण इंटरनॅशनलच्या एका विशेष अहवालानुसार, ही निवड शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली करण्यात आली. सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे एक्सपर्ट असेंबलीची पूर्ण बैठक होऊ शकली नाही, म्हणून हा निर्णय व्हर्च्युअल बैठका आणि अंतर्गत सल्लामसलत करून घेण्यात आला.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने मोजतबा यांना पाठिंबा देण्यासाठी कट्टरपंथी गटांना एकत्र आणल्याचे वृत्त आहे. हा गट खामेनेई यांच्या जवळचा गट होता. सुरक्षा यंत्रणेत त्यांची मजबूत पकड आहे.

मोजतबा खामेनेई हे मध्यम-स्तरीय शिया धर्मगुरू आहेत.  त्यांनी पडद्यामागे दीर्घकाळ प्रभावशाली भूमिका बजावली आहे. ही नियुक्ती वादग्रस्त आहे. कारण इराणच्या इस्लामिक क्रांतीचा गट वंशपरंपरागत उत्तराधिकार नाकारतो आणि अनेक कट्टरपंथी लोक त्यावर आक्षेप घेऊ शकतात, या निवडीला ते 'राजशाही' असे म्हणू शकतात.मोजतबा यांची धार्मिक पात्रता देखील सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी अपुरी मानली जाते, पण आयआरजीसीच्या पाठिंब्यामुळे ते शक्य झाले.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायली हल्ल्यात अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, त्यानंतर तीन सदस्यांच्या अंतरिम परिषदेने तात्पुरते सत्ता हाती घेतली. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले होते की, लवकरच नवीन नेता निवडला जाऊ शकतो. मोजतबा यांची नियुक्ती आता इराणमधील कट्टरपंथी शक्तींना आणखी बळकटी देणारी म्हणून पाहिली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mojtaba Khamenei: Iran's New Supreme Leader Appointed Amidst Controversy

Web Summary : Amidst Israeli-American attacks and the death of Ayatollah Ali Khamenei, Mojtaba Khamenei has been appointed Iran's Supreme Leader. The selection, reportedly influenced by the Islamic Revolutionary Guard Corps, faces opposition due to its hereditary nature and Mojtaba's religious qualifications. The appointment strengthens hardliners.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई