चीनच्या सोशल मीडियावर मोदींचे खाते
By Admin | Updated: May 4, 2015 23:00 IST2015-05-04T23:00:20+5:302015-05-04T23:00:20+5:30
चीनच्या अधिकृत भेटीआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील लोकप्रिय वेबसाईट सीना वायबोवर स्वत:चे खाते उघडले

चीनच्या सोशल मीडियावर मोदींचे खाते
बीजिंग : चीनच्या अधिकृत भेटीआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील लोकप्रिय वेबसाईट सीना वायबोवर स्वत:चे खाते उघडले. ५०० दशलक्ष खातेदार असणाऱ्या या वेबसाईटवर मोदी आल्याने चिनी नागरिकांनी त्यांचे भरघोस स्वागत केले, पण काही जणांनी मात्र चीनमध्ये दक्षिण तिबेट म्हणून ओळखला जाणारा भारताचा अरुणाचल प्रदेश चीनचाच असल्याचे मोदी यांना बजावून सांगितले आहे.
हॅलो चायना, लुकिंग फॉरवर्ड टू इंटरअॅक्टिंग चिनी फ्रेंड्स अशी पहिली पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या ट्विटर व फेसबुकचे मिश्रण असणाऱ्या वायबो या साईटवर टाकली आहे. या पोस्टला लगेचच हजारो चाहते मिळाले. पहिल्या तासात मोदी यांना ७ हजार चाहते मिळाले. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी वायबो जॉईन केले आहे. (वृत्तसंस्था)