शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

मोदींसोबत सकारात्मक चर्चा, ते योग्य तोच निर्णय घेतील : ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:47 IST

सोमवारी मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे ‘व्हाइट हाउस’ने म्हटले आहे

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अवैध प्रवाशांबाबत कठोर भूमिका घेतलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मंगळवारी विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले. 

फेब्रुवारी महिन्यात मोदी व्हाइट हाउसला भेट देण्याची शक्यता असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. सोमवारी मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे ‘व्हाइट हाउस’ने म्हटले आहे.  या चर्चेत द्विपक्षीय व्यापारविषयक संबंधांसह इतर क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने दोनही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मैत्रीतून वाढेल व्यापारव्हाइट हाउसनुसार, मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीतून एक धोरणात्मक सहकार्याचा भक्कम सेतू दोन्ही देशांत उभारला जाईल. शिवाय भारतही अमेरिकेकडून सुरक्षा उपकरणांची खरेदी वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्यावर भर देईल. 

क्वाडमधून चीनला आव्हानव्हाइट हाउसनुसार, अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया सदस्य देश असलेल्या इंडो-पॅसिफिक देशांच्या ‘क्वाड’ संघटनेची भूमिका भारत-अमेरिका संबंधांत महत्त्वाची ठरणार असून, या वर्षाच्या अखेरीस ‘क्वाड’ परिषद भारतात होत आहे.चीनचा या भागातील वाढता प्रभाव पाहता हे क्वाड देश परस्पर सहकार्य वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प-मोदी संबंध महत्त्वाचे ठरणार आहेत. 

मोदी-ट्रम्प मैत्रीपर्वसप्टेंबर २०१९ मध्ये ह्युस्टनमध्ये आणि फेब्रुवारी २०२० मध्ये अहमदाबाद येथे या दोन्ही नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. २०२४ मध्ये विजयानंतर जगातील ज्या तीन प्रमुख नेत्यांशी ट्रम्प यांनी चर्चा केली त्यात मोदी यांचा समावेश होता. व्यापाराच्या क्षेत्रात अमेरिका हा देश भारताचा सर्वात मोठा भागिदार असून या दोन्ही देशांत २०२३-२४मध्ये ११८ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता.

असा ठरेल योगायोगडोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी शेवटचा परदेश दौरा भारताचा केला होता. आता मोदी फेब्रुवारीत अमेरिका दौऱ्यावर गेले तर ट्रम्प यांच्या नव्या कार्यकाळात मोदींचा हा पहिला अमेरिका दौरा ठरेल.

भारताला चिंता कशाची?निवडून येताच ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ देशांवर १०० टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. उभरत्या अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या या संघटनेत भारत, चीन, रशिया, ब्राझील यांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेने लागू केलेल्या शुल्काचा फटका भारताला बसू शकतो.स्थलांतरितांचा प्रश्न भारताच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. कारण, लाखो भारतीय अमेरिकेत विविध क्षेत्रांत कार्यरत असून, ट्रम्प यांच्या कठोर धोरणाचा फटका यातील बऱ्याच भारतीयांना बसू  शकतो.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका