मोदी-शरीफ यांची आज भेट

By Admin | Updated: July 10, 2015 01:24 IST2015-07-10T01:24:32+5:302015-07-10T01:24:32+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ शुक्रवारी रशियात एससीओ शिखर परिषदेदरम्यान भेटत आहेत.

Modi-Sharif visits today | मोदी-शरीफ यांची आज भेट

मोदी-शरीफ यांची आज भेट

उफा- ( रशिया) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ शुक्रवारी रशियात एससीओ शिखर परिषदेदरम्यान भेटत आहेत. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधात गेला वर्षभर आलेल्या उतार चढावानंतर मोदी व शरीफ यांची ही भेट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान नवाज शरीफ शुक्रवारी उफा येथे द्विपक्षीय बैठकीसाठी भेटत आहेत. ही भेट भारतीय वेळेनुसार ९.४५ वाजता शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) परिषदे दरम्यान होत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितले. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी या दोन नेत्यांच्या बैठकीची शक्यता वर्तविली होती, आज त्याचे खात्रीलायक वृत्त देण्यात आले. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Modi-Sharif visits today