शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या जेवणात मिसळायचा ड्रग्स, मग परपुरुषांकडून करवून घ्यायचा बलात्कार, ५१ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 09:14 IST

Crime News: पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका इसमावर पत्नीला भोजनातून अमली पदार्थ मिसळून ती नशेत असताना तिच्यावर परपुरुषांकडून बलात्कार करवून घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका इसमावर पत्नीला भोजनातून अमली पदार्थ मिसळून ती नशेत असताना तिच्यावर परपुरुषांकडून बलात्कार करवून घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार फ्रान्समध्ये घडला असून, द टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार या प्रकाराबाबत अज्ञात असलेल्या पत्नीवर हा अत्याचार दहा वर्षे सुरू होता. या दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी बलात्काराच्या ९२ प्रकरणांची पुष्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी २६ ते ७३ वयोगटातील ५१ पुरुषांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. यामधील एक फायरमॅन, एक ट्रक ड्रायव्हर, एक नगरसेवक, एक बँकेतील आयटी कर्मचारी, जेल गार्ड आणि एका पत्रकाराचाही समावेश आहे.

आरोपी इसम त्याच्या पत्नीला जेवणामध्ये औषध मिसळून द्यायचा. त्यानंतर तो परपुरुषांना पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या घरी बोलवायचा. या बलात्काराच्या घटना २०११ ते २०२० दरम्यान घडल्या असून, यातील बहुतांश पुरुषांनी या महिलेवर वारंवार बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पती लैंगिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करत असे. तसेच ते चित्रण यूएसबी ड्राइव्हवर फाइलमध्ये ठेवायचा. हे सर्व चित्रिकरण पोलिसांकडे आहे. या दाम्पत्याच्या विवाहाला अनेक वर्षे झाली असून, त्यांना तीन मुलेही आहेत.

आरोपी इसम एका अश्लील वेबसाइटवरून परपुरुषांच्या संपर्कात आला होता. २०२० मध्ये आरोपी इसमाविरोधात चेंजिंग रूममध्ये महिलांची रेकॉर्डिंग करण्यासाठी हिडन कॅमेऱ्याचा वापर झाल्याची आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला. पीडित महिलेला जेव्हा या प्रकाराबाबत सांगण्यात आले, तेव्हा तिला जबर धक्का बसला. ती तणावाखाली गेली. त्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपFranceफ्रान्स