फेसबूकवर मैत्रिणीला 'पोक' केलं म्हणून मित्राची केली हत्या
By Admin | Updated: October 6, 2014 15:36 IST2014-10-06T12:20:22+5:302014-10-06T15:36:31+5:30
गर्लफ्रेंडला सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर 'पोक' केल्याने एका ब्रिटीश तरूणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फेसबूकवर मैत्रिणीला 'पोक' केलं म्हणून मित्राची केली हत्या
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ६ - गर्लफ्रेंडला सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर 'पोक' केल्याने एका ब्रिटीश तरूणाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लंडनमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी स्कॉट या २७ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.
टॅक्सीतून जात असता स्कॉटचे त्याचा मित्र रिचर्ड (वय २९) याच्याशी भांडण झाले. रिचर्डने आपल्या गर्लफ्रेंडशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्कॉट चिडला होता. मात्र स्कॉटचे त्या मुलीशी संबंध असल्याचे आपल्याला महीत नव्हते असे रिचर्डने सांगितले. दोघांच्या या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले आणि स्कॉटने रिचर्डचे डोके जमीनीवर आपटले, त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती टॅक्सी चालकाने दिली. याप्रकरणी स्कॉटला चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.