बेपत्ता विमान समुद्रातच कोसळले, ४० प्रवाशांचे मृतदेह सापडले
By Admin | Updated: December 30, 2014 18:13 IST2014-12-30T14:57:46+5:302014-12-30T18:13:02+5:30
एअर एशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सुमात्राच्या पूर्व किनारपट्टीजवळील समुद्रात आढळून आले आहेत.

बेपत्ता विमान समुद्रातच कोसळले, ४० प्रवाशांचे मृतदेह सापडले
>ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. ३० - एअर एशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सुमात्राच्या पूर्व किनारपट्टीजवळील समुद्रात आढळले असून विमानातील ४० प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत.
इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे QZ ८५०१ हे विमान रविवारी सकाळी बेपत्ता झाले होते. विमानाच्या शोध मोहिमेदरम्यान, मंगळवारी आप्तकालीन तसेच मुख्य दरवाजाचे काही अवशेष समुद्रात सापडले, अशी माहिती इंडोनेशियन अधिका-यांनी दिली आहे. तसेच समुद्रात लाईफ जॅकेट्स व बोट दिसल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या या विमानाला येथेच जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळी बेपत्ता झालेल्या या समुद्रात १५५ प्रवासी आणि सात कर्मचारी असे १६२ जण होते.