अमेरिकेकडे दुर्लक्ष करुन इराणकडून क्षेपणास्त्र चाचणी

By Admin | Updated: March 9, 2016 17:02 IST2016-03-09T17:02:35+5:302016-03-09T17:02:35+5:30

अमेरिकेच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन इराणने बुधवारी सकाळी दोन बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांची चाचणी केली.

Missile test by Iran, ignoring the US | अमेरिकेकडे दुर्लक्ष करुन इराणकडून क्षेपणास्त्र चाचणी

अमेरिकेकडे दुर्लक्ष करुन इराणकडून क्षेपणास्त्र चाचणी

ऑनलाइन लोकमत 

दुबई, दि. ९  - अमेरिकेच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन इराणने बुधवारी सकाळी दोन बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. इराणची क्षमता दाखवण्यासाठी आणि कुठल्याही धोक्याचा सामना करण्यासाठी तयार असल्याचा संदेश देण्यासाठी ही चाचणी केल्याचे इराणच्या (आयआरजीसी)ने सांगितले. 
इराणचा प्रखर विरोधक असलेला इस्त्रायल या क्षेपणस्त्राच्या टप्प्यात येतो. उत्तर इराणमधून डागण्यात आलेल्या दोन कादर क्षेपणास्त्रांनी नियोजित लक्ष्यभेद  केला. या क्षेपणास्त्रांचा टप्पा २ हजार कि.मी.चा आहे. 
इराणच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर इस्त्रायलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेने अलीकडेच काही अटींवर इराणवरील निर्बंध उठवले आहेत

Web Title: Missile test by Iran, ignoring the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.