शत्रू देशाची क्षणात राखरांगोळी करू शकते हे मिसाईल
By Admin | Updated: October 28, 2016 16:55 IST2016-10-28T14:57:35+5:302016-10-28T16:55:21+5:30
जगभरात शस्त्रास्त्र स्पर्धा तीव्र झालेली असतानाच रशियानेही अत्यंत घातक असे क्षेपणास्त्र आपल्या शस्त्रसाठ्यात जमा केले आहे.

शत्रू देशाची क्षणात राखरांगोळी करू शकते हे मिसाईल
>ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 28 - जगभरात शस्त्रास्त्र स्पर्धा तीव्र झालेली असतानाच रशियानेही अत्यंत घातक असे क्षेपणास्त्र आपल्या शस्त्रसाठ्यात जमा केले आहे. आरएस 28 असे या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राचे नाव असून, हे क्षेपणास्त्र पाकिस्तानएवढ्या देशाची क्षणभरात राखरांगोळी करू शकते.
आरएस-28 हे पहिले सुपर हेवी आणि थर्मोन्यूक्लियन बाँबने युक्त असे क्षेपणास्त्र आहे. 100 टन वजनाचे अवजड असे हे क्षेपणास्त्र 10 टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. तसेच एकाचवेळी 16 छोटी आणि 10 मोठी अण्वस्त्रे वाहून नेण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.
या क्षेपणास्त्राचा वेग 7 किमी प्रतिसेकंद एवढा असून, ते दहा हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर ते मारा करू शकते. त्यामुळे जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेनेही या क्षेपणास्त्राचा धसका घेतला आहे.
याच्या विद्ध्वंसक क्षमतेमुळे नाटो देशांनी या क्षेपणास्त्राला सेटन-2 अर्थात सैतान असे नाव दिले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राची विद्ध्वंसक क्षमता इतकी भयंकर आहे की त्याच्यासमोर हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेले अणुबाँब किरकोळ ठरतील.