ऑनलाइन लोकमतमोगादिशू, दि. 4 - इस्लामिक स्टेटचा दहशतवादी समजून सुरक्षारक्षकाद्वारे केल्या गेलेल्या गोळीबारात सोमालियाचा मंत्रीच ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. दहशतवादाने ग्रस्त असलेल्या सोमालियामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त सुरू असताना, त्यांना रोडच्यामध्ये कार उभी आढळली. ते वाहन दहशतवाद्यांचे असल्याचा संशय आल्यामुळे सुरक्षा दलाने बेधडक गोळीबार केला. यामध्ये सोमालियाचे बांधकाम मंत्री अब्बास अब्दुल्ही शेख सिराजी ठार झाले.
सोमालियात दहशतवादी समजून मंत्र्यावर झाडल्या गोळ्या
By admin | Updated: May 4, 2017 02:05 IST