शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:58 IST

...या भीतीने पाकिस्तान सतर्क झाल्याचे दिसत आहे!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली लष्कर-ए-तैयबाची आघाडीची संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) वर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. यानंतर, पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आता भारत पुन्हा एअर स्ट्राइक तर करणार नाही ना? या भीतीने पाकिस्तान सतर्क झाल्याचे दिसत आहे. कारण, पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीत एक आठवड्यासाठी नोटम (NOTAM) जारी केला आहे.

पाकिस्तानी लष्काराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 से 23 जुलैपर्यंत सेंट्रल सेक्टरची हवाई हद्द पूर्णपणे बंद राहील. तसेच 22 आणि 23 जुलाईला दक्षिणी पाकिस्तानची हवाई सीमाही बंद राहणार आहे. मात्र, अधिकृतपणे या मागचे कारण, लष्करी सराव अथवा क्षेपणास्त्र परीक्षण सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात नुकतीच चिनी कार्गो विमानांची हालचाल दिसून आली आहे. यामुळे, चीनने पाकिस्तानला नवे लष्करी तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे आणि एअर डिफेंस सिस्टिम पुरवल्याची शक्यताही बळावली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव -पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना टीआरएफचा सहभाग असल्याचे समोर आले. यानंतर प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई सीमा बंद केली आहे. दोन्ही देशांमधील संवाद जवळजवळ थांबला आहे आणि सीमेवर सुरक्षा दलांची तैनाती वाढवली आहे, यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

'द रेझिस्टन्स फ्रंट'वर अमेरिकेने घातली बंदी -पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली लष्कर-ए-तैयबाची आघाडीची संघटना असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) वर अमेरिकेने बंदी घातली आहे. ही संघटना लष्करची एक छुपी शाखा आहे, जी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवून आणत असते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन