मिका सिंगची चौकशीनंतर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 04:49 AM2018-12-08T04:49:38+5:302018-12-08T04:49:40+5:30

ब्राझीलच्या १७ वर्षीय मॉडेल तरुणीला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवल्याच्या आरोपावरून दुबई येथे अटक करण्यात आलेल्या बॉलीवूडचा गायक मिका सिंगला गुरुवारी रात्री चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.

Mika Singh was released after the inquiry | मिका सिंगची चौकशीनंतर सुटका

मिका सिंगची चौकशीनंतर सुटका

Next

आबूधाबी : ब्राझीलच्या १७ वर्षीय मॉडेल तरुणीला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवल्याच्या आरोपावरून दुबई येथे अटक करण्यात आलेल्या बॉलीवूडचा गायक मिका सिंगला गुरुवारी रात्री चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.
युएईतील भारतीय राजदूत नवदीपसिंग सूरी यांनी ही माहिती दिली. दुबईत अटक करून मिका सिंगला आबूधाबीला नेण्यात आले होते. मिका सिंगला युएईतील कोर्टात हजर रहावे लागणार आहे, असेही
सूरी यांनी प्रसारमाध्यमांना कळवले आहे.
मिका सिंग दुबईत एका कार्यक्रमासाठी तो गेला होता. आपल्याला मिकाने आक्षेपार्ह फोटो पाठविल्याची तक्रार एका १७ वर्षीय मॉडेलने मुरक्काबात पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास मिका सिंग याला अटक करण्यात होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Mika Singh was released after the inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.