शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 16:49 IST

Middle East War : मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

Middle East War : मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्रायल सातत्याने लेबनॉन आणि गाझावर हल्ले करत आहे. तर, इराण आणि लेबनॉनकडून इस्रायलवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. आता इराण आणि इस्रायलमध्ये थेट युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अमेरिकेकडून एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. 'इस्रायलने इराणला प्रत्युत्तर द्यावे, पण त्यांच्या आण्विक प्रकल्पांवर हल्ले करू नका', असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांनी केले आहे.

काय म्हणाले इस्रायलचे माजी पंतप्रधान?इस्त्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी त्यांच्या X (ट्विटर) हँडलवर लिहिले की, 'गेल्या 30 वर्षांपासून इराण इस्रायलींमध्ये दहशत पसरवत आहे. त्यांनी हिजबुल्ला, हमास, इस्लामिक जिहादद्वारे इस्रायल उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. इराण सरकारने या दहशतवाद्यांना पैसा, प्रशिक्षण आणि शस्त्रे पुरवली. आमच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान नसते, तर या क्षेपणास्त्रांमुळे हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला असता. आता इराणच्या आण्विक कार्यक्रमाविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. त्यांची केंद्रीय ऊर्जा केंद्रे पूर्णपणे नष्ट करू, जेणेकरून दहशतवाद्यांचे साम्राज्य संपुष्टात येईल.'

आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?

दुसरीकडे, इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमधील फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी TotalEnergies गॅस स्टेशनला लक्ष्य केले आहे. इस्रायलचा हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नेतान्याहू (Benjamin netanyahu) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. रिपोर्टनुसार, बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात इस्रायलने फ्रेंच कंपनी टोटल एनर्जीवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर स्टेशनवर मोठी आग लागली, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू