मायकल शूमाकर कोमातून बाहेर
By Admin | Updated: June 16, 2014 15:43 IST2014-06-16T15:42:20+5:302014-06-16T15:43:01+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून कोमात असलेला फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकल शूमाकर अखेर कोमातून बाहेर आला आहे.

मायकल शूमाकर कोमातून बाहेर
ऑनलाइन टीम
पॅरिस, दि. १६ - गेल्या सहा महिन्यांपासून कोमात असलेला फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकल शूमाकर अखेर कोमातून बाहेर आला आहे. शूमाकरला रुग्णालयातूनही डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या त्याला कुठे नेण्यात आले आहे याविषयी मात्र कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.
सात वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन ठरलेला जर्मनीचा चालक मायकल शूमाकर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये फ्रान्समध्ये स्कीईंग करत असताना पडला होता. यात शुमाकरचे डोके दगडावर आपटल्याने तो गंभीर जखमी झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने शूमाकर कोमात गेला होता. त्याच्यावर शस्त्रक्रीयाही करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्यावर ग्रेनोबल रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरुवातीचे दीड ते दोन महिने शूमाकरची प्रकृती अत्यंत गंभीर होती. शुमाकरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जगभरातील शूमाकरचे चाहते प्रार्थना करत होते. अखेरीस शूमाकर या दुखापतीवर यशस्वीरित्या मात करत कोमातून बाहेर आला आहे.