शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेहुल चोक्सीला भारतात पाठविणार, अँटिग्वा पंतप्रधानांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 10:15 IST

Mehul Choksi News: भारतातून परागंदा झाल्यानंतर चोक्सी हा अँटिग्वात लपून बसला होता. काही दिवसांपूर्वी तो अँटिग्वातून पळून डॉमिनिकात गेला होता. तेथे त्याला आता अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील १३,५०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक फरार आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकात अटक करण्यात आली असून, त्याला परस्पर भारतात पाठविण्यात येईल, असे अँटिग्वा व बरबुडाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊन यांनी म्हटले आहे. भारताने त्याच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी, असेही ब्राऊन यांनी म्हटले आहे.भारतातून परागंदा झाल्यानंतर चोक्सी हा अँटिग्वात लपून बसला होता. काही दिवसांपूर्वी तो अँटिग्वातून पळून डॉमिनिकात गेला होता. तेथे त्याला आता अटक करण्यात आली आहे.ब्राऊन यांनी सांगितले की, मी डॉमिनिकाच्या पंतप्रधानांशी बोललो आहे. मी त्यांना सांगितले की, चोक्सीला अटक करून अँटिग्वाला पाठवू नका, त्याऐवजी त्याला परस्पर भारतात पाठवा. त्याला इथे घटनात्मक संरक्षण असल्यामुळे आम्ही त्याला परत स्वीकारणार नाही.  ब्राऊन यांनी सांगितले की, ‘देशात अवैध प्रवेश केला म्हणून चोक्सीला डॉमिनिकाच्या सरकारने अटक करावी आणि त्याला अवैध घोषित करून भारतात पाठवावे.’ मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामध्ये कोणतेही घटनात्मक संरक्षण नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण करणे सोपे होईल. ब्राऊन यांनी म्हटले की, अँटिग्वा सोडून चोक्सीने घोडचूक केली आहे. डॉमिनिकाचे सरकार सहकार्य करीत आहे. आम्ही भारत सरकारलाही याची माहिती दिली असून, त्याच्या प्रत्यार्पणाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्याचा मास्टर माइंड नीरव मोदी याचा मामा असून त्याचाही या घोटाळ्यात सहभाग आहे. त्याला बुधवारी डॉमिनिकात अटक करण्यात आली. तो सध्या तेथील सीआयडीच्या ताब्यात आहे. चोक्सी हा जानेवारी २०१८ पासून अँटिग्वा व बरबुडामध्ये होता. तो अलीकडे बेपत्ता झाला  होता. 

प्रत्यार्पणाविरुद्ध करणार अपीलमेहुल चोक्सी याचे वकील विजय अगरवाल यांनी लोकमतला सांगितले की, चोक्सी याचे बेकायदेशीररीत्या प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरुद्ध डॉमिनिका न्यायालयात अपील केले जाईल. डॉमिनिकामध्ये ब्रिटिश कायदे लागू असून, त्यात मानवाधिकाराची काळजी घेतली जाते.अगरवाल यांनी सांगितले की, चोक्सी हा अँटिग्वाचे नागरिक असून, तो डॉमिनिकात स्वत:च्या इच्छेने गेलेला नाही. त्यांला तेथे कसे नेले गेले याचा आम्ही शोध घेत आहोत. अँटिग्वाच्या उच्च न्यायालयाने चोकसी याचे प्रत्यार्पण होऊ शकत नाही, असा निकाल यापूर्वीच दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी