शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहूल चोकसी लबाडच, त्याचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करणार, अँटिग्वाच्या पंतप्रधानांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 08:55 IST

भारतातून फरार झालेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चौकसीचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे.

न्यूयॉर्क - भारतातून फरार झालेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चौकसीचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता वाढली आहे. मेहूल चोकसी हा लबाडच असल्याचे सांगत अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांनी मेहूल चौकसीच्या प्रत्यार्पणाचे संकेत दिले आहे.  मेहूल चौकसीने केलेल्या गुन्ह्यांबाबत आम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे आश्वासन अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी दिले आले. मेहूल चोकसी हा सध्या अँटिग्वामध्ये लपला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनात सहभाग घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे आलेले अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांच्याकडे मेहूल चोकसीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, ''मेहूल चोकसी हा लबाड असल्याची पुरेशी माहिती मला मिळाली आहे. मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सध्या याबाबत आम्ही काही करू शकत नाही. मात्र मेहूल चोकसीला अँटिग्वा आणि बर्बुडामध्ये ठेवण्याची आमची इच्छा नाही.''

भारतीय अधिकाऱ्यांना मेहूल चोकसीची चौकशी करण्याची परवानगी देणार का अशी विचारणा केली असता, ब्राऊन यांनी मेहूल चोकसीची चौकशी करण्यास आपली काहीच हरकत नसल्याचे सांगितले. "भारतीय अधिकारी हवी तेव्हा मेहूल चोकशीची चौकशी करू शकतात. मात्र त्यासाठी चोकसीने सहकार्य केले पाहिजे. मात्र सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकरणात सरकार काहीच करू शकत नाही.'' दरम्यान, मेहूल चोकसी हा बदमाश आहे हे माहीत असते तर त्याला अँटिग्वाचे नागरिकत्व दिले नसते. आता त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाईल, कारण त्याच्यामुळे अँटिग्वाची प्रतिष्ठा वाढलेली नाही.''मेहूल चोकसी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी खोटी कागदपत्रे बनवून पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला होता. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी आणि मेहूल चोकसी परदेशात पसार झाले होते. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCrime Newsगुन्हेगारी