मीडिया मुगल रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा अडकणार विवाहबंधनात
By Admin | Updated: January 12, 2016 13:16 IST2016-01-12T13:16:40+5:302016-01-12T13:16:40+5:30
प्रसारमाध्यमातील दिग्गज रुपर्ट मरडॉक यांनी माजी सुपरमॉडेल जेरी हॉलशी साखरपुडा झाल्याचे जाहीर केले आहे. मरडॉक यांचा हा चौथा विवाह आहे.

मीडिया मुगल रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा अडकणार विवाहबंधनात
>ऑनलाइन लोकमत
लॉस एंजलिस, दि. १२ - प्रसारमाध्यमातील दिग्गज रुपर्ट मरडॉक यांनी माजी सुपरमॉडेल जेरी हॉलशी साखरपुडा झाल्याचे जाहीर केले आहे. मरडॉक यांचा हा चौथा विवाह आहे.
मरडॉक यांच्या मालकिच्या टाइम्समध्ये जाहिरातीच्या माध्यमातून मरडॉक यांनी ही बातमी सांगितली आहे. गेले काही महिने एकमेकांच्या सहवासात आनंद मिळाल्यामुळे लग्न करायचा विचार पक्का केल्याचे मरडॉक यांच्या प्रवक्त्याने जाहिरातीत म्हटले आहे.
सुपरमॉडेल जेरी हॉल हिचा माइक जॅगर याच्याशी विवाह झाला होता, व २० वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले. तर मरडॉक यांचा याआधी तीन वेळा विवाह झाला आहे. वेंडी डेंगशी त्यांचे तिसरे लग्न झाले, परंतु १४ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर २०१३ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर जेरी हॉल मरडॉक यांच्या संपर्कात आल्या.