शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषात भीषण आग; ४० हून अधिक मृत्यू, १०० जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:49 IST

जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

क्रॅन्स-मोंटाना (स्वित्झर्लंड) : स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या स्विस आल्प्समधील एका बारमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४०हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, किमान १०० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

व्हॅलिस कॅन्टनमधील ‘ले कॉन्स्टेलेशन’ या बारमध्ये सेलिब्रेशन सुरू असताना ही आग लागली. व्हॅलिस कॅन्टनच्या पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, मृतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. सध्या बळींची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.

आरोग्य यंत्रणेवर ताणजखमींची संख्या इतकी मोठी आहे की, प्रादेशिक रुग्णालयातील आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर फुल्ल झाले असल्याने कमी पडत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभवदोन महिला प्रत्यक्षदर्शींनी फ्रेंच वृत्तवाहिनीला सांगितले की, एका बारमनने बारमधील एका महिला कर्मचाऱ्याला आपल्या खांद्यावर बसवले होते. त्या महिलेच्या हातात बाटलीमध्ये एक पेटलेली मेणबत्ती होती, ज्याचा स्पर्श लाकडी छताला झाला. यामुळे छताने तत्काळ पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण छत कोसळले. आगीतून वाचण्यासाठी लोक खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उड्या मारत होते. धूर आणि आगीच्या ज्वाळांमधून बाहेर पडण्यासाठी लोकांची धावपळ उडाली होती.  

...म्हणून भीषणता वाढलीअग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही आग ‘एम्ब्रेसमेंट जनरलाइज’ प्रकारची होती. यामध्ये आगीमुळे निर्माण होणारे ज्वलनशील वायू अचानक पेट घेतात, ज्याला इंग्रजीत ‘फ्लॅशओव्हर’ किंवा ‘बॅकड्राफ्ट’ म्हटले जाते.

यामुळे आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले. त्यामुळे आणि जीना व बाहेर पडण्याचा दरवाजा अत्यंत अरुंद असल्याने उपस्थितांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. हा कोणताही दहशतवादी हल्ला नसल्याचे ॲटर्नी जनरल बीट्रिस पिलॉड यांनी स्पष्ट केले. 

खबरदारीचे आवाहन -क्रॅन्स-मोंटाना हे जगातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने येथे मोठी गर्दी आहे. आधीच वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याने, स्थानिक प्रशासन आणि पर्यटकांना पुढील काही दिवस सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून इतर कोणत्याही अपघातामुळे यंत्रणेवर अधिक ताण येणार नाही.जखमींना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि रुग्णवाहिकांची मदत घेतली गेली. यात अनेक देशांतील पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Switzerland New Year Fire Tragedy: Dozens Dead, Hundreds Injured

Web Summary : A devastating fire during New Year celebrations in a Swiss Alps bar has reportedly killed over 40 and injured 100. The blaze, possibly triggered by a lit candle contacting the wooden ceiling, quickly engulfed the bar. Rescue efforts are underway, complicated by strained medical resources in the region.
टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडfireआग