हत्याकांडाचा कट अनामिक खबरीमुळे उधळला
By Admin | Updated: February 16, 2015 00:13 IST2015-02-16T00:13:32+5:302015-02-16T00:13:32+5:30
कॅनडातील एका मॉलमध्ये व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी हत्याकांड घडविण्याचा जीवघेण्या संघटनेचा कट एका अनामिकाने दिलेल्या माहितीमुळे

हत्याकांडाचा कट अनामिक खबरीमुळे उधळला
टोरोन्टो : कॅनडातील एका मॉलमध्ये व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी हत्याकांड घडविण्याचा जीवघेण्या संघटनेचा कट एका अनामिकाने दिलेल्या माहितीमुळे उधळून लावण्यात पोलिसांना यश आले, असे विधिमंत्री पीटर मॅकी यांनी सांगितले.
पोलिसांनी दोघांवर खुनाचा कट रचल्याचा आरोप ठेवला असून, अन्य एका संशयिताची सुटका केली. हॅलिफॅक्स शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार करून मोठे हत्याकांड घडविण्याचा कट या संघटनेने रचला होता. या कटातील एक जण या शॉपिंग सेंटरबाहेरच मृतावस्थेत आढळला, असे पोलिसांनी सांगितले.(वृत्तसंस्था)