मार्क्सच्या हस्तलिखिताचा ५ लाख डॉलरना लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:17 IST2018-05-24T00:17:07+5:302018-05-24T00:17:07+5:30
मार्क्सने १८५० ते १८५३ या काळात १,२५० पानी हस्तलिखित टिपणे लिहिली व त्यातून ‘दास कपिताल’ हा ग्रंथ आकाराला आला.

मार्क्सच्या हस्तलिखिताचा ५ लाख डॉलरना लिलाव
बीजिंग : कार्ल मार्क्सच्या ‘दास कपिताल’ या सुप्रसिद्ध ग्रंथांच्या सुरुवातीच्या कच्च्या हस्तलिखित मसुद्यातील एक पान मंगळवारी येथे झालेल्या लिलावात ५.२३ लाख डॉलरना (३.३४ दशलक्ष युआन) गेले.
यंदा कार्ल मार्क्सचे २०० वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्त फेंग लुन या चिनी उद्योजकाने मार्क्सचे हे हस्तलिखित लिलावास उपलब्ध करून दिले होते. मार्क्सने १८५० ते १८५३ या काळात १,२५० पानी हस्तलिखित टिपणे लिहिली व त्यातून ‘दास कपिताल’ हा ग्रंथ आकाराला आला. ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’चे सहलेखक फ्रेडरिक एन्जल्स यांचेही एक हस्तलिखित या लिलावात १.६७ युआनला विकले गेले. एंजल्स यांनी १८६२ मध्ये एका जर्मन वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाचे ते हस्तलिखित होते. (वृत्तसंस्था)