ओबामांची कन्या माल्यासाठी विवाहाचा प्रस्ताव
By Admin | Updated: June 1, 2015 02:10 IST2015-06-01T02:10:31+5:302015-06-01T02:10:31+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी मुलगी माल्या (१६) हिच्यावर केनियातील एका वकिलाचे प्रेम बसले असून, त्याने विवाहाचा प्रस्ताव मांडला आहे

ओबामांची कन्या माल्यासाठी विवाहाचा प्रस्ताव
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी मुलगी माल्या (१६) हिच्यावर केनियातील एका वकिलाचे प्रेम बसले असून, त्याने विवाहाचा प्रस्ताव मांडला आहे. विवाहात मुलाकडून हुंडा म्हणून ९० हजार डॉलर किमतीचे १५० प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्राण्यात ७० गाई, ५० बकऱ्या व ३० मेंढ्या यांचा समावेश आहे.
फेलिक्स कि प्रोनो असे या २४ वर्षाच्या वकीलाचे नाव असून , तो म्हणतो, लोकांना वाटेल की ओबामा कुटुंबाच्या संपत्तीकडे पाहून मी माल्याला विवाहाचा प्रस्ताव देतो आहे, पण तसे काही नाही, माझे प्रेम खरे आहे, माल्याशी विवाह करणे हे माझे जुनेच स्वप्न आहे.
फेलिक्स सध्या ब्रिटनमधील आॅक्सफर्ड विद्यापीठात कायदा क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ओबामा कुटुंब मूळचे केनियाचे असल्याचे सांगत किप्रोनो म्हणतो केनियन रक्त पुन्हा आपल्या भूमीकडे यावे अशी माझी इच्छा आहे. २००८ साली मला माल्याविषयी कळले , तेव्हापासून मी तिच्या प्रेमात आहे, एवढेच नाही तर तिच्याशी एकनिष्ठ राहायचे म्हणून मी दुसऱ्या कोणाला डेटिंगलाही बोलावले नाही. माझी ही आवड मी घरातल्या लोकांना सांगितली आहे, त्यानाही माल्या पसंत असून, त्यानी हुंड्याची रक्कम वाढविण्याचीही तयारी दर्शविली आहे.
ओबामा जुलै महिन्यात केनियाला येणार आहेत, त्यावेळी त्याना भेटून हा प्रस्ताव देण्याचा फेलिक्सचा विचार आहे. सध्या तो ओबामा यांना पत्र लिहीत असून केनिया भेटीत त्यानी माल्याला बरोबर आणावे अशी विनंती करणार आहे. हे पत्र तो नैरोबी येथील अमेरिकन दूतावासाला देणार आहे. किप्रोनो याने आपल्या वंशाची घर घराण्याची माहितीही दिली असून,आपले कुटुंब अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाच्या बरोबरीचे आहे असा त्याचा दावा आहे. केनियातील कालेंजिन समाजाचा हा युवक आहे.