पाकच्या हिंदूंना मिळणार विवाह कायदा

By Admin | Updated: February 10, 2016 08:54 IST2016-02-10T01:20:38+5:302016-02-10T08:54:46+5:30

पाकिस्तानातील हिंदूंना अखेर अनेक दशकांनंतर हिंदू विवाह कायदा मिळणार आहे. या कायद्याची मागणी अनेक दशकांपासून होऊनही तिच्याकडे संबंधितांनी केलेले दुर्लक्ष व निष्क्रियता संपुष्टात

Marriage law to be given to Pak Hindus | पाकच्या हिंदूंना मिळणार विवाह कायदा

पाकच्या हिंदूंना मिळणार विवाह कायदा

इस्लामाबाद : पाकिस्तानातील हिंदूंना अखेर अनेक दशकांनंतर हिंदू विवाह कायदा मिळणार आहे. या कायद्याची मागणी अनेक दशकांपासून होऊनही तिच्याकडे संबंधितांनी केलेले दुर्लक्ष व निष्क्रियता संपुष्टात आली असून, संसदीय मंडळाने एकमताने हिंदू विवाह विधेयकाला मान्यता दिली आहे.
नॅशनल असेम्ब्लीच्या स्थायी समितीने (कायदा आणि न्याय) सोमवारी हिंदू विवाह विधेयक २०१५ चा अंतिम मसुदा संमत केला. तेथे पाच हिंदू लोकप्रतिनिधींना मुद्दाम बोलावण्यात आले होते. विधेयकाला विलंब लावण्याच्या खेळी शेवटपर्यंत सुरूच होत्या तरीही समितीने विधेयक एकमताने संमत केले. त्याआधी विधेयकात स्त्री आणि पुरुषासाठी विवाहाचे किमान वय १८ निश्चित करणे आणि कायदा संपूर्ण देशात लागू करणे या दोन दुरुस्त्या करण्यात आल्या, असे वृत्त ‘डॉन’ने दिले. असेम्ब्लीमध्ये सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) (पीएमएल-एन) बहुमत असल्यामुळे ते सहजपणे संमत होईल.
आम्ही ९९ टक्के संख्येतील लोक एक टक्क्यातील लोकसंख्येला भीत असू तर आम्ही कोणते दावे करतो आणि आम्ही काय आहोत याचा स्वत:च्या मनात शोध घेतला पाहिजे, असे विर्क म्हणाले.

Web Title: Marriage law to be given to Pak Hindus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.