11 वर्षांपासून सिंगापुरात मराठी कवितांच्या वाचनाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 18:33 IST2016-10-24T18:33:42+5:302016-10-24T18:33:42+5:30

सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने गेली 11 वर्षे शब्दगंध हा स्वरचित मराठी कवितांच्या वाचनाचा उपक्रम राबविण्यात येतो

Marathi poetry reading program in Singapore for 11 years | 11 वर्षांपासून सिंगापुरात मराठी कवितांच्या वाचनाचा उपक्रम

11 वर्षांपासून सिंगापुरात मराठी कवितांच्या वाचनाचा उपक्रम

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने गेली 11 वर्षे शब्दगंध हा स्वरचित मराठी कवितांच्या वाचनाचा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाच्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील साहित्यिक सहभागी झाले होते. मराठी विश्वकोष मंडळाच्या माजी अध्यक्षा विजया वाड, साहित्यिका रेखा नार्वेकर, गौरी कुलकर्णी, लता गुठे, लेखक प्रकाश कुलकर्णी यांचा यावेळी सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक साहित्यिका मोहना कारखानीस यांनी केले. सिंगापूरमधील मराठी भाषिकांचा या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.
 

Web Title: Marathi poetry reading program in Singapore for 11 years