शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

टॉयलेट रिपेयर करायला गेला पण करोडपती झाला, ही अजब गोष्ट वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 15:44 IST

एक अनोखं प्रकरण अमेरिकेच्या टेक्सासमधून समोर आलं आहे. यात एका व्यक्तीला टॉयलेटमध्ये तब्बल ४ कोटी रूपये मिळाले.

देणारा जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. काही लोक काहीही मेहनत न करता अचानक श्रीमंत होतात. हे बहुतेकदा तेव्हा होतं, जेव्हा एखाद्याला लॉटरी (Lottery) लागते किंवा पैशांनी भरलेली बॅग सापडते. सध्या असंच एक अनोखं प्रकरण अमेरिकेच्या टेक्सासमधून समोर आलं आहे. यात एका व्यक्तीला टॉयलेटमध्ये तब्बल ४ कोटी रूपये मिळाले.

ज्या व्यक्तीला टॉयलेटमध्ये इतकी मोठी रक्कम मिळाली तो एक प्लंबर होता. तो टॉयलेटमधील भिंतीचं काम करत होता. यासाठी त्याने ही भिंत तोडण्यास सुरुवात केली आणि यानंतर जे काही दिसलं ते पाहून तो हैराण झाला. २०१४ साली Lakewood Church मधून ६ लाख डॉलर चोरी झाले होते. जस्टिन कॉले नावाचा हा प्लंबर जेव्हा चर्चमधील बाथरूमची भिंत रिपेअर करत होता, तेव्हाच त्याचं नशीब बदललं. काम करताना त्याला असं जाणवलं की या भिंतीच्या आतमध्ये काहीतरी लपवलं गेलं आहे.

भिंतीचं प्लास्टर काढताच त्याला तिथे चार कोटी रुपये कॅश आणि चेकच्या स्वरुपात आढळले. हे पाहून तो हैराण झाला आणि विचारात पडला की असं कसं होऊ शकतं. यानंतर त्याने असा निर्णय घेतला की यातील एक रुपयाही तो आपल्या घरी घेऊन जाणार नाही.

द गार्जियनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या प्लंबरने अतिशय प्रामाणिकपणा दाखवला. त्याने ही संपूर्ण घटना चर्च प्रशासनाला सांगितली आणि ही संपूर्ण रक्कम चर्च मॅनेजमेंटकडे दिली. हे सर्व पैसे टॉयलेटच्या भिंतीमध्ये लपवण्यात आले होते. सध्या चर्च प्रशासनाने या प्लंबरच्या प्रामाणिकपणामुळे खूश होऊन त्याला बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. चर्चच्या भिंतीमध्ये आढळलेल्या पैशांमधील काही रक्कम जस्टिनला दिली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, है पैसे तब्बल सात वर्षांपूर्वी चर्चमधूनच चोरी झाले होते. खूप शोधूनही हे पैसे मिळाले नाहीत. आता टॉयटलेटच्या भिंतीमध्ये हे पैसे आढळले. चर्चने लाखो रुपये क्राईम स्टॉपर्स नावाच्या एका एजंसीला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जेव्हा कंपनीला जस्टिनच्या प्रामाणिकपणाबद्दल समजलं तेव्हा हे पैसे जस्टिनला देण्यात आले. इतकंच नाही तर चर्चनेही म्हटलं की जस्टिनचा प्रामाणिकपणा बघता त्याला बक्षीस म्हणून पैसे दिले जातील. जस्टिनने सांगितलं की त्याची अनेक थकीत बिलं भरण्यासाठी हे पैसे त्याच्या कामी येणार आहेत.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके