तरूणाने प्रायव्हेट पार्टमध्ये घेतलं असं इंजेक्शन, साइड इफेक्ट झाल्यावर गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 03:17 PM2022-07-02T15:17:11+5:302022-07-02T15:17:30+5:30

London : जॅक हा ऑस्ट्रेलियाचा राहणारा होता. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचं कारण सिलिकॉन इंजेक्शन सिंड्रोम असं सांगितलं. सोबतच त्याला फुप्फुसाचीही समस्या होती.

Man dies after injecting silicone into his testicles private part | तरूणाने प्रायव्हेट पार्टमध्ये घेतलं असं इंजेक्शन, साइड इफेक्ट झाल्यावर गमावला जीव

तरूणाने प्रायव्हेट पार्टमध्ये घेतलं असं इंजेक्शन, साइड इफेक्ट झाल्यावर गमावला जीव

googlenewsNext

प्रायव्हेट पार्टमध्ये सिलिकॉन  इंजेक्शन घेतल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झला. इंजेक्शन घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे साइड इफेक्ट्स दिसले. ज्याचे त्याने फोटोही शेअर केले होते. इंजेक्शनमुळे त्याची स्थिती इतकी वाईट झाली होती की, नंतर त्याचा मृत्यू झाला.  28 वर्षीय या तरूणाचं नाव होतं जॅक चॅपमॅन. जॅक हा ऑस्ट्रेलियाचा राहणारा होता.

डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचं कारण सिलिकॉन इंजेक्शन सिंड्रोम असं सांगितलं. सोबतच त्याला फुप्फुसाचीही समस्या होती. प्रायव्हेट पार्टमध्ये सिलिकॉन इंजेक्शन घेतल्यानंतर जॅकने सूज आल्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याने लिहिलं होतं की, हे इंजेक्शनचे साइड इफेक्टस आहेत. 

मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार, जॅक समलैंगिक समुदायात Master Slave Relationship मध्ये सहभागी होता. जॅकच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी एक फेमस समलैंगिक ब्लॉगर डायलनला दोषी ठरवलं. आरोप आहे की, शरीरात बदल करण्यासाठी सिलिकॉन इंजेक्शन घेण्यासाठी तो जॅकला प्रेरित करत होता. ही घटना 2019 मधील आहे. पण काही दिवसांपूर्वी याप्रकरणी जॅकच्या आईने जबाब दिला. ज्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं.

जॅकच्या आईने आरोप केला की, बॉडी मॅनिपुलेशनसाठी जॅकने इंजेक्शन घेतलं होतं आणि याच्या साइड इफेक्टमुळे काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याला यासाठी प्रेरित करण्यात आलं होतं. बॉडी मॅनिपुलेशन एक प्रकारची चिकित्सा आहे ज्यात डॉक्टर रूग्णाच्या शरीराच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त भागात बदल करतात.

Web Title: Man dies after injecting silicone into his testicles private part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.