शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रसार करणं पडलं भारी; झाली 5 वर्षांची तुरुंगवारी; 'या' देशाने नियम मोडणाऱ्याला दिली शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 12:09 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा प्रसार करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. थेट पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून तुरुंगात रवानगी झाली आहे.

हनोई - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोनाचा प्रसार करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. थेट पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून तुरुंगात रवानगी झाली आहे. व्हिएतनाममध्ये एका व्यक्तीला कोरोना नियमांचं उल्लंघन करणं भारी पडलं आहे. 

कोरोनाचा संसर्ग फैलावल्याप्रकरणी ही व्यक्ती दोषी आढळली असून पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. व्हिएतनाममध्ये ही घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 28 वर्षीय ली वॅन ट्री या तरुणालाही शिक्षा ठोठावण्यात आली. व्हिएतनाम न्यूज एजन्सीने (VNA) दिलेल्या वृ्त्तानुसार, ट्री याला 21 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र हा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्याने हो चि मिन्ह शहरातून पुन्हा सीए माउ शहरामध्ये दाखल झाला. 

आठ जणांना कोरोनाचा संसर्ग, एकाचा मृत्यू 

ट्रीमुळे आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यातील एका व्यक्तीचा एका महिन्याच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवलेल्या मोजक्या देशांमध्ये व्हिएतनामचा समावेश आहे. व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विविध निर्बंध लागू केले होते. त्याच्या परिणामी संसर्गावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, एप्रिल महिन्यानंतर व्हिएतनाममध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागली. डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा निर्बंध लागू केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण

अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत असून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतची सर्वात भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 6.62 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात देखील जागा शिल्लक नसल्याचं चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी