शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चक्क सह-संस्थापकाला मेल करून वन प्लस ५टी मागितला गिफ्ट म्हणून   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 13:24 IST

मुंबई : बहुप्रतिक्षित असलेला वनप्लस ५टी भारतात लॉन्च झाला आहे. मोबाईलची किंमत जास्त असली तरीही हा मोबाईल घेता यावा याकरता प्रत्येक मोबाईलप्रेमी प्रयत्न करतोय. पण एका पठ्ठ्याने वेगळीच शक्कल लढवलीय. वन प्लस टीचा चाहता म्हणून मोफत मोबाईल मिळणं हा नैसर्गिक अधिकार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. असं सांगून हा मोबाईल गिफ्ट म्हणून देण्यात ...

ठळक मुद्देहा तरुण वन प्लस टीचा मोठा चाहता असल्याशिवाय तो असं करणार नाही.या भारतीय तरूणाने केलेला मेल कार्ल पीने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.त्याला फोन मिळेल की नाही माहीत नाही पण तो ट्रोल मात्र मोठ्या प्रमाणावर होतोय.

मुंबई : बहुप्रतिक्षित असलेला वनप्लस ५टी भारतात लॉन्च झाला आहे. मोबाईलची किंमत जास्त असली तरीही हा मोबाईल घेता यावा याकरता प्रत्येक मोबाईलप्रेमी प्रयत्न करतोय. पण एका पठ्ठ्याने वेगळीच शक्कल लढवलीय. वन प्लस टीचा चाहता म्हणून मोफत मोबाईल मिळणं हा नैसर्गिक अधिकार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. असं सांगून हा मोबाईल गिफ्ट म्हणून देण्यात यावा अशी विनंती त्याने वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पी यांना इमेलद्वारे विनंती केली आहे. 

कृष्णकुमार व्ही असं या तरुणाचं नाव असून त्याने त्या मेलमध्ये असं म्हटलं आहे की, ‘माझ्या वनप्लस या मोबाईलमध्ये रिबूटची समस्या झाली आहे. त्यामुळे तुमचं नवं मॉडेल मला गिफ्ट म्हणून मिळणं माझा नैसर्गिक अधिकार आहे.’ ही विनंती ऐकून कार्ल यांनाही हसू आवरलं नाही. त्यांनी त्वरीत या मेलचा स्क्रीन शॉर्ट काढून ट्विटरवर शेअर केला. ट्विटरवर ही पोस्ट शेअर होताच अनेकांनी यावर आपल्यालाही असा नैसर्गिक अधिकार असून मलाही हा फोन मोफत मिळायला हवा अशी कमेंट केलेली आहे. 

आणखी वाचा -  'वन प्लस ५ टी'चे स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल !

चायनिज मॅन्यूफॅक्चरर असलेल्या वनप्लसची पहिली आवृत्ती २०१३ साली लॉन्च झाली होती. अल्पावधितच या कंपनीने जगभर स्वत:चं विश्व निर्माण केलं. भारतातही या कंपनीने आपले पाय रोवले आहेत. त्याचप्रमाणे नुकताच भारतात वनप्लस ५ टी हा मोबाईल लॉन्च झाला. भारतीयांकडे बार्गेनिंग पॉवर भारी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत भाव कमी-जास्त केला जातो. ‘पुछने मे क्या जाता है’ अशीही भारतीयांची संस्कृती असल्याने एखादी गोष्ट आपल्याला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतेय हे हमखास पाहीलं जातं. या पठ्ठ्यानेही नेमकं तेच केलं. आपला मेल पाहून कदाचित त्यांना आपल्याला मोफत मोबाईल द्यावासा वाटला तर आपली लॉटरीच लागेल, मग ‘पुछने मे क्या जाता है? पण सध्या त्याचा मेल ट्वीटवर हास्याचा विषय बनला आहे.

तंत्रज्ञानासंबंधित अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

कार्ल पी यांनी केलेल्या या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केलं असून आपल्यालाही हा नैसर्गिक अधिकार असून आम्हालाही हा मोबाईल मोफत मिळावा अशी हास्यास्पद विनंती करण्यात आली आहे. एका पठ्ठ्याने तर चक्क ‘माझा वाढदिवस जवळ येत असून मलाही हा मोबाईल गिफ्ट करा, मी आयुष्यभर तुमचा फोटो माझ्या वॉलपेपरला लावून ठेवीन’ असं रिट्विट केलं आहे. कार्ल यांच्या या ट्वीटमुळे सगळ्याच नेटीझन्सनी हास्याची तोफ डागली आहे. असा मेल येणं हे काही पहिल्यांदाच झालंय अशातला भाग नाही. कृष्णकुमार याने याआधीही असा मेल केला होता, मात्र तेव्हा त्यांनी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. मात्र त्याचा आत्मविश्वास बघता त्याने केलेल्या दुसऱ्या मेलला त्यांनी चांगलंच उत्तर दिलंय. 

सौजन्य - www.india.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलTwitterट्विटर