शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मालदीव सरकारची समुद्राच्या खोल पाण्यात कॅबिनेट बैठक; नेमकं कारण काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मंत्र्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मालदीव चर्चेत आले आहे.

India vs Maldives: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच लक्षद्वीपचा दौरा केला आणि देशातील लोकांनाही तिथे जाण्याचे आवाहन केले. त्यांचे लक्षद्वीपचे फोटो पाहून मालदीवचे मंत्री इतके भडकले की, त्यांनी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यही केले. याचा परिणाम म्हणून #BoycottMaldives भारतात ट्रेंड होऊ लागला. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला मालदीवमध्ये घडलेल्या एका अनोख्या घटनेबद्दल सांगणार आहोत.

30 मिनिटे चालली बैठकही घटना ऑक्टोबर 2009 ची आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे मालदीवसारख्या देशांना अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. मालदीवचा बहुतांश भाग समुद्रसपाटीपासून फक्त एक मीटर उंच आहे. 2100 सालापर्यंत हा देश समुद्रात बुडू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. धोका इतका मोठा आहे की, दरवर्षी देशाचा काही भाग समुद्राच्या पाण्यात मिसळतोय. उच्च तापमानाच्या संकटाबाबतीत जगाला सावध करण्यासाठी तिथल्या सरकारने 19 ऑक्टोबर 2009 रोजी चक्क समुद्रात मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. मालदीवचे सरकार 30 मिनिटे पाण्याखाली होते.

सर्व कॅबिनेट समुद्राच्या पाण्यातमालदीवचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत 11 मंत्री आणि कॅबिनेट सचिवांनीही भाग घेतला होता. ही बैठक 15 फूट पाण्याखाली झाली, त्यासाठी सर्व मंत्री ऑक्सीजन मास्क लावून समुद्राच्या पाण्यात उतरले. प्रत्येकाने एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये जगातील सर्व देशांना धोकादायक वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये सर्व नेते काळे डायव्हिंग सूट आणि मास्क घातलेले दिसत होते.

जगातील पहिलीच घटनाअध्यक्ष आणि मंत्र्यांना बसण्यासाठी पाण्याखाली टेबल लावण्यात आले होते. राष्ट्रपतींसह सर्वच मंत्री पाण्याखाली हाताच्या इशाऱ्यांनी बोलले आणि वॉटरप्रूफ बोर्डवर अमिट शाईने टिप्पण्या लिहिल्या गेल्या. यावेळी सर्व मंत्र्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक मंत्र्यासोबत एक कुशल पाणबुड्या(स्कुबा डायव्हर) पाठवला होता. मालदीवमधील शार्कदेखील फार आक्रमक नाहीत, त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची भीती नव्हती. समुद्राच्या पाण्यात मंत्रिमंडळाची बैठक झाल्याची ही जगातील पहिलीच घटना होती.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलNarendra Modiनरेंद्र मोदी