शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवचा भारताला धक्का; भेट दिलेलं हेलिकॉप्टर परत देण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:06 IST

मालदीव चीनच्या जवळ जात असल्याने भारताला मोठा धक्का

मालदीवसोबतचे भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवने भारताला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. भारत सरकारकडून भेट म्हणून देण्यात आलेले हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी मालदीवने सुरु केली आहे. भारताने मालदीवच्या नौदलाला दोन हेलिकॉप्टर्स भेट म्हणून दिली होती. यापैकी एक हेलिकॉप्टर परत नेण्याची सूचना मालदीवकडून करण्यात आली आहे. मालदीवने हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी सुरू केल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यासंदर्भात अब्दुल्ला यामीन सरकारशी संवाद साधला जात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मालदीवला भारताकडून ध्रुव अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरऐवजी (एएलएच) डॉर्नियर मॅरिटाईम सर्विलान्स एअरक्राफ्ट हवे आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जातो, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.मालदीवला जे हेलिकॉप्टर भारताला परत करायचे आहे, ते अद्दू बेटावर तैनात आहे. मात्र हे हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी मालदीवने सुरु केल्यामुळे भारत आणि मालदीवमधील सुरक्षा संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला असताना मालदीवकडून हेलिकॉप्टर परत करण्याचे वृत्त आल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. चीनकडून मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. चीनने मालदीवमध्ये पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्याचा धडाका लावला आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या मदतीने चीनकडून 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स'ची उभारणी केली जाते आहे. यामुळे भारताची मोठी कोंडी होऊ शकते. त्यातच काल पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी रविवारी मालदीवचा दौरा केला. मालदीव, चीन आणि पाकिस्तानची ही जवळीक भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान