मलेशियन जहाज बेपत्ता, अपहरण झाल्याची शक्यता

By Admin | Updated: September 10, 2015 20:52 IST2015-09-10T20:51:51+5:302015-09-10T20:52:17+5:30

१४ कर्मचा-यांसह मलेशियातून निघालेले मालवाहू जहाज दक्षिण चीन समुद्रात बेपत्ता झाले असून या जहाजाचे अपहरण झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

Malaysian ship missing, likely to be abducted | मलेशियन जहाज बेपत्ता, अपहरण झाल्याची शक्यता

मलेशियन जहाज बेपत्ता, अपहरण झाल्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत 

क्वालालांपूर, दि. १० - १४ कर्मचा-यांसह मलेशियातून निघालेले मालवाहू जहाज दक्षिण चीन समुद्रात बेपत्ता झाले असून या जहाजाचे अपहरण झाल्याची भीती वर्तवली जात आहे. जहाजावर १४ कर्मचारी असून यात भारतीयांचादेखील समावेश आहे. 
मलेशियन कंपनीचे मालवाहतूक करणारे जहाज मलेशियाच्या सागरी हद्दीतून ३ सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. या जहाजाशी अद्याप काहीही संपर्क झाला नसला तरी बुधवारी संध्याकाळी मलेशियातील मिरीजवळील सागरीहद्दीत मिरी येथे हे जहाज दिसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या जहाजाचे अपहरण झाले असावे अशी शक्यता आहे. या जहाजावर १४ कर्मचारी असून यात काही भारतीय असल्याचे समजते. या जहाजाचा शोध सुरु आहे.  

Web Title: Malaysian ship missing, likely to be abducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.