शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
4
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
5
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
6
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
7
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
8
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
9
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
10
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
11
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
13
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
14
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
15
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
16
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
18
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
19
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
20
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

'मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील', 'पद्मावत'च्या रिलीजवर मलेशियामध्ये बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 08:53 IST

मलेशियामध्ये पद्मावतच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - प्रचंड वादविवाद, विरोधानंतर अखेर संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा भारतात रिलीज झाला.  भारतात जरी 'पद्मावत'च्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला असला तरीही मलेशियामध्ये पद्मावतच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. राजपूतांचा अपमान करणारा सिनेमा असल्याचा आरोप करत भारतात करणी सेनेनं पद्मावतविरोधात तीव्र-हिंसक आंदोलनं केली होती. तर दुसरीकडे, मलेशियामध्ये 'इस्लामिक धर्मियांच्या भावना' लक्षात घेत पद्मावतवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डनं देशात संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतच्या रिलीजवर बंदी आणली आहे. ज्या पद्धतीनं सिनेमामध्ये अलाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे, त्यानुसार मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचं म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम बहुल देश मलेशियामध्ये सिनेमातील कथा चिंतेचा विषय आहे, असे मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डचे अध्यक्ष मोहम्मद जाम्बेरी अब्दुल अजीज यांनी सांगितले. अजीज यांनी पुढे असेही म्हटले की, सिनेमातील कथेमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि ही बाब मलेशियासारख्या मुस्लिम बहुल देशासाठी चिंतेचा विषय आहे. 16 व्या शतकातील भारतीय कवी मलिक मोहम्मद जायसी यांनी लिहिलेल्या कथेवरुन पद्मावत सिनेमा साकारण्यात आला आहे. या सिनेमाचे नाव सुरुवातीला पद्मावती असे ठेवण्यात आले होते. मात्र सिनेमाला प्रचंड विरोध करण्यात आला. त्यामुळे सेन्सॉर बोर्डच्या सूचनेनुसार सिनेमाचं नाव पद्मावत असे करण्यात आले.

इतिहासात छेडछाड केल्याचा आरोप करत करणी सेनेनं पद्मावत सिनेमाला तीव्र विरोध दर्शवला होता. राजपूतांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे करण्यात येत असल्याचा आरोप करणी सेनेनं केला होता. सिनेमा रिलीज  होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी हिंसक निदर्शनंदेखील करण्यात आली.  दरम्यान, प्रचंड विरोधानंतरही भारतात 25 जानेवारीला पद्मावत सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला.

शुटिंगच्या वेळी यायच्या अलाउद्दीन खिल्जीसारख्या भावना- रणवीर सिंग

दरम्यान, सिनेमात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहला व त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळते आहे. सिनेमात नकारात्मक भूमिका साकारूनही रणवीरवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तसंच त्याच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.  अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारतानाचा आलेला अनुभव रणवीरने शेअर केला आहे. अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी मी खूप घाबरलो होतो. भूमिकेला न्याय देऊ शकेल का? याबद्दलची मनात भीती होती. ही भूमिका साकारताना दलदलीच उतरावं लागणार याची पूर्ण कल्पना मला होती. पण मीच अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारावी, असा संजय लीला भन्साळी यांचा अट्टहास होता. ते माझे गुरू असल्याने त्यांना नकार देणं मला शक्य नव्हतं, असं रणवीर सिंह म्हणाला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या विश्वासामुळे मी भूमिकेसाठी होकार कळविला. बाजीरावसोबतच या सिनेमाच शुटिंग सुरू झाल्याने दोन्ही भूमिकेत उतरणं कठीण होतं. त्यातच माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने माझं शुटिंग लांबणीवर गेलं. सिनेमातील इतर सगळ्या भूमिकांचं शूटिंग पूर्ण झालं होतं. फक्त माझ्याचं भूमिकेचं शूटिंग बाकी होतं. शेवटच्या 40 दिवसात मी सिनेमाचं शुट पूर्ण केलं. एकाच कॉस्ट्यूम ड्रामामध्ये तुम्हाला सतत 40 दिवस शुट करायला लागतं तेव्हा तुम्ही मनातून खचता. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात नेहमी कलाकारांना त्यांचं स्ट्रेस दूर करण्यासाठी ब्रेक मिळतो. पण मला ब्रेक मिळाला नव्हता. 

मी दररोज 12-14 तास शुटिंग करायचो. त्यावेळी अलाउद्दीन खिल्जीच्या झोनमध्ये गेलो होतो. त्यावेळी माझ्या अंगात फक्त वाईटप्रवृत्ती भरली होती. मी माझ्या कुटुंबीयांशी व मित्रांशी बोलणं बंद केलं होतं. सिनेमाच्या शूटिंगनंतर पुन्हा रणवीर व्हायला मी माझ्या आईशी बोलायला सुरूवात केली. मित्रांशी बोलायला सुरूवात केली. खिल्जीच्या भूमिकेत मी इतक्या खोलात उतरलो होतो की माझ्या मनात त्याच्यासारखेच विचार यायचे. कधीकधी शुटिंग करत नसताना माझ्या मनात खिल्जीसारख्या भावना यायचा. कुणी माझ्या समोर चूक केली की त्याचा गळा दाबायची इच्छा मला व्हायची, असंही रणवीर म्हणाला. मी साकारलेल्या नकारत्मक भूमिकेलाही चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल्याचा आनंद आहे, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. 

टॅग्स :Padmavatपद्मावतSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीKarni Senaकरणी सेनाRanveer Singhरणवीर सिंग