तब्बल 6 वर्षांनंतर मलाला युसूफझाई मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 08:37 AM2018-03-29T08:37:13+5:302018-03-29T10:07:53+5:30

नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई तब्बल 6 वर्षांनी मायदेशी, पाकिस्तानात परतली आहे.

malala yousafzai returns to pakistan after 6 years | तब्बल 6 वर्षांनंतर मलाला युसूफझाई मायदेशी

तब्बल 6 वर्षांनंतर मलाला युसूफझाई मायदेशी

googlenewsNext

इस्लामाबाद - नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई तब्बल 6 वर्षांनी पाकिस्तानात परतली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी मलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यानंतर प्रथमच मलाला पाकिस्तानात आली आहे. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दुबईमार्गे पाकिस्तानात दाखल झाली आहे. सहा वर्षांपूर्वी 2012मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी मलालावर हल्ला केला होता. हल्ल्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यानंतर तिनं पाकिस्तान सोडले होते व पाकिस्तान सोडून ती इंग्लंडमध्ये वास्तव्यास गेली.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी (29 मार्च) पहाटेच्या सुमारास बेनजीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावर मलाला दाखल झाली. यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था मलाला हिला एका हॉटेलमध्ये आणणण्यात आले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मलाला मायदेशी परतली आहे.  यादरम्यान ती पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी, लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, यांच्यासह विविध मान्यवरांची भेट घेणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मलाला पाकिस्तानात येणार असल्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. 




 

Web Title: malala yousafzai returns to pakistan after 6 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.