शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:09 IST

हा स्फोट इतका भयंकर होता की, त्याच्या आवाजाने २ घरांवरील छत खाली कोसळली आणि त्यात ६ मुले जखमी झालेत.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील उत्तरी वजीरिस्तान इथं आत्मघातकी हल्ला झाला आहे. या बॉम्बस्फोटात १३ हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. मीर अली खादी मार्केटमध्ये झालेल्या या हल्ल्यात जखमींमध्ये १२ हून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ज्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे बोलले जाते. 

माहितीनुसार, एका कारने सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला जोरदार टक्कर मारली. ते बॉम्ब डिस्पोजल (EOD) युनिटचे वाहन होते. सैन्याचे वाहन नागरी भागात ड्युटीवर जात होते. त्यावेळी हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान(TTP) चा गट उसूद उल हर्ब याने जबाबदारी घेतली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात स्फोटकांनी भरलेली कार सैन्याच्या ताफ्याला धडकली त्यातून झालेल्या स्फोटात १३ सैनिक ठार झाले. १० जवान जखमी आहेत त्याशिवाय १९ सर्वसामान्य नागरिकही जखमी झाले. या स्फोटाने आसपासच्या रहिवासी घरांनाही मोठे नुकसान झाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

तर हा स्फोट इतका भयंकर होता की, त्याच्या आवाजाने २ घरांवरील छत खाली कोसळली आणि त्यात ६ मुले जखमी झालेत. हा आत्मघातकी हल्ला अशावेळी झाला जेव्हा पाकिस्तानात विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान प्रांतात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानी सैन्याने टीटीपी दहशतवादी संघटनेशी निगडीत १० संशयित दहशतवाद्यांना मारले होते. मार्चमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी गुडालार आणि पीरू कुनरी येथील जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला केला होता. ज्यात २१ प्रवासी आणइ ४ अर्धसैनिक दलाचे जवान मारले गेले होते. 

दरम्यान, जागतिक दहशतवादी आकडेवारी २०२५ नुसार, पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढली आहे. २०२३ साली ७४८ जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. २०२४ साली मृतांचा आकडा १०८१ पर्यंत वाढला. त्याशिवाय पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोट