तैवान आज भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरले. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे मोठमोठ्या इमारती हलल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या भूकंपाची तीव्रता ७ मॅग्निट्युड एवढी मोजण्यात आली. तसेच तैवानपासून भारतातील आसामपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाच्या या झटक्यांमुळे अनेक गगनचुंबी इमारती हलू लागल्या. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दरम्यान, आज भारतातील आसाममध्येही ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे घबराट पसरली. मात्र थोड्याच वेळात परिस्थिती निवळली. तैवानमधील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तैवानच्या उत्तर पूर्व किनारी भागात ७.०० मॅग्निट्युट तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपाचं केंद्र हे यिलान येथे होते. तसेच ते येथून ३२ किमी अंतरावर होते. तर भूकंपाची खोली ७२.८ किमी एवढी होती. तैवानची राजधानी असलेल्या तायपैमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारती हलल्या.
दरम्यान, या भूकंपानंतर अद्याप कुठल्याही प्रकारच्या नुकसानाची माहिती समोर आलेली नाही. नुकसानीचा आणि जीवितहानीचा आढावा घेण्यासाठी परिस्थितीचं आकलन केलं जात आहे, असं तैवानमधील अग्निशमन संस्थेनं सांगितलं आहे.
Web Summary : A magnitude 7 earthquake struck Taiwan, shaking buildings and causing widespread panic. Tremors were felt as far away as Assam, India. While no immediate damage reports exist, assessments are underway.
Web Summary : ताइवान में 7 तीव्रता का भूकंप आया, जिससे इमारतें हिल गईं और दहशत फैल गई। झटके भारत में असम तक महसूस किए गए। नुकसान की तत्काल कोई खबर नहीं, आकलन जारी है।