शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 07:45 IST

Boat Capsized In Congo : मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

काँगोमध्ये मोठा अपघात झाला आहे. येथे एक बोट उलटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर अनेक फुटबॉलपटूही होते. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित प्रांत प्रवक्ते अ‍ॅलेक्सिस म्पुटू यांनी म्हटले आहे की, हे खेळाडू रविवारी रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामना खेळून परतत असताना त्यांना घेऊन जाणारी बोट क्वा नदीत उलटली.

मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. खरे तर, रात्रीच्या वेळी  काँगोमध्ये असे बोट अपघात सामान्य आहेत. कारण येथील वाहतुकीचे मुख्य साधन नद्याच आहेत. 

असं आहे बोट अपघातांचं कारण - काँगोमध्ये रस्ते आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागांतील नागरिकांसाठी नद्या हा वाहतुकीचा एक मुख्य पर्याय आहे. महत्वाचे म्हणजे, काँगोतील १० कोटींहून अधिक लोक हे नद्यांवर अवलंबून आहेत. मात्र सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची कमतरता आणि बोटिंची गर्दी, यामुळे अशा प्रकारचे अपघात सर्वसामान्य झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत अनेकांचा मृत्यू -काँगोमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बोट अपघात झाले असून यांत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे मुबलक रस्ते नसल्याने लोकांना नदी मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र असुरक्षित बोटींमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होता. हे अपघात रोखण्यासाठी, सरकार सागरी सुरक्षा नियम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही अशा अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातFootballफुटबॉलDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे