शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 08:01 IST

Video - डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना शनिवारी अमेरिकन एअरलाइन्सचं विमान AA३०२३ च्या लँडिंग गियरमध्ये आग लागली.

डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना शनिवारी अमेरिकन एअरलाइन्सचं विमान AA३०२३ च्या लँडिंग गियरमध्ये आग लागली. लँडिंग गियरला आग लागल्यानंतर विमानातील सर्व १७३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे.

डेनवर अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग ७३७ मॅक्स विमान डेनवरहून मियामीसाठी रनवे ३४L वरून उड्डाण घेत असताना ही घटना घडली. विमानाच्या टायरमध्ये समस्या निर्माण झाली, ज्यामुळे विमानाला रनवेवर थांबवावं लागलं. डेनवर विमानतळाने पुष्टी केली की, सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित आहेत. गेटवरील एका व्यक्तीला किरकोळ दुखापतींमुळे वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

फ्लाईटअवेअरच्या मते, विमान दुपारी १:१२ वाजता गेट C३४ वरून निघणार होतं, परंतु दुपारी २:४५ वाजता टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली. प्रवाशांना बसेसद्वारे टर्मिनलवर नेण्यात आले. फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (FAA) ने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

अमेरिकन एअरलाइन्सने नंतर पुष्टी केली की विमानात टायरशी संबंधित समस्या होती, ज्यामुळे ते सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे आणि त्यांच्या देखभाल टीमकडून त्याची चौकशी केली जात आहे. शनिवारी संध्याकाळी, डेनवर अग्निशमन विभागाने विमानातील आग आटोक्यात आणली असल्याची माहिती दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रनवेवर मध्यभागी उभ्या असलेल्या विमानाच्या टायरला आग लागल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाfireआगAirportविमानतळairplaneविमान