ब्रिटनमधील टॉप ३०० श्रीमंतांमधून महाराणी बाद
By Admin | Updated: April 28, 2015 13:51 IST2015-04-28T13:50:03+5:302015-04-28T13:51:42+5:30
तब्बल ३२०० कोटी रुपयांची मालकी असलेल्या ब्रिटनच्या महाराणीचा पहिल्यांदाच ब्रिटनमधील ३०० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा यादीत समावेश होऊ शकलेला नाही.

ब्रिटनमधील टॉप ३०० श्रीमंतांमधून महाराणी बाद
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २८ - तब्बल ३२०० कोटी रुपयांची मालकी असलेल्या ब्रिटनच्या महाराणीचा पहिल्यांदाच ब्रिटनमधील ३०० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा यादीत समावेश होऊ शकलेला नाही. यंदाच्या वर्षी क्वीन एलिझाबेथ यांच्या संपत्तीमध्ये ७० कोटी रुपयांची वाढ होऊनही त्यांना ३०२ व्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे. तर भारतीय वंशाचे उद्योजक श्री व गोपी या हिंदूजा बंधूचा ब्रिटनमध्ये सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत दुसरा क्रमांक लागला आहे.
ब्रिटनमधील एका ख्यातनाम वृत्तपत्राने ब्रिटनमधील एक हजार सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीत क्वीन एलिझाबेथ यांचा टॉप३०० जणांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. एलिझाबेथ यांची सध्याची संपत्ती ३४० मिलीयन यूरो एवढी आहे. तर मुळचे युक्रेनचे लेन ब्लावनिक हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती १३.१७ बिलीयन युरो (९०० हून अधिक कोटी) एवढी आहे. भारतीय वंशाचे हिंदूजा बंधू १३ बिलीयन यूरोसह दुस-या स्थानावर आहेत. २००९ च्या आर्थिक मंदीनंतरही ब्रिटनमधील अब्जाधीशांची वाढती संख्या हे ब्रिटनमध्ये अच्छे दिन आल्याचे दर्शवते.