चीनमध्ये ‘मॅजिक बनी’ सोशल मीडियावर व्हायरल
By Admin | Updated: March 28, 2015 00:00 IST2015-03-28T00:00:51+5:302015-03-28T00:00:51+5:30
जागतिक पातळीवरील सोशल मीडियावर सध्या चीनमधील मॅजिक बनीची चर्चा सुरू आहे. जगात फारसा माहीत नसलेला हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता असणारा अत्यंत गोड व छोटासा आहे.

चीनमध्ये ‘मॅजिक बनी’ सोशल मीडियावर व्हायरल
बीजिंग : जागतिक पातळीवरील सोशल मीडियावर सध्या चीनमधील मॅजिक बनीची चर्चा सुरू आहे. जगात फारसा माहीत नसलेला हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता असणारा अत्यंत गोड व छोटासा आहे. ६० वर्षांचे निवृत्त वनसंरक्षक ली विडाँग गेली ३० वर्षे मॅजिक बनीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सशासारखा दिसणारा हा सस्तन प्राणी फक्त चीनमध्ये आढळतो. आता फक्त १ हजार ली पायका राहिले असून, ते चीनमधील पांडापेक्षाही अधिक दुर्मिळ बनले आहेत.
ली विडाँग यांना १९८३ साली प्रथमच मॅजिक बनी दिसला. पहिली भेट कशी झाली याचे वर्णनही ते करतात. ली विडाँग पर्वतावर चढत होते. चार तासांची चढण चढून पूर्ण दमछाक झाली असताना एक छोटा प्राणी पळत गेल्याचे दिसले. ते जवळच असलेल्या दगडाजवळ बसले आणि मागून दोन सशासारखे कान उभे राहिले. एक अत्यंत सुंदर असा छोटा प्राणी एकटक पाहताना आढळला.
तीन वर्षे संशोधन केल्यानंतर विडाँग व त्यांच्या साथीदारांनी या प्राण्याचे नाव ली पायका असे ठेवले. (वृत्तसंस्था)