शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

मादागास्करचा 'ब्लॅक डेथ' शेजारील देशांमध्ये पसरण्याचा धोका ; प्लेगचे 124 बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 16:22 IST

मादागास्करमध्ये गेले दोन दिवस पसरलेल्या प्लेगने 124 लोकांचे प्राण घेतले आहेत. त्याचप्रमाणे मादागास्करमधील 1300 लोकांना प्लेगची लागण झाली आहे. अत्यंत वेगाने पसरलेल्या या ब्लॅक डेथ नावाने ओळखलेल्या साथीने मादागास्करची सीमा ओलांडून आग्नेय आफ्रिकेतील देशांमध्ये प्रवेश करण्याची भीती निर्माण झाली आहे.  

ठळक मुद्देदरवर्षी मादागास्करमध्ये प्लेगची 400 लोकांना लागण झालेले दिसून येते. मात्र ते सगळे ब्युबॉनिक प्लेगचे रुग्ण असतात, आता आलेली साथ ही न्युमॉनिक प्लेगची असून ती जास्त धोकादायक आहे. ही साथ पूर्व मादागास्कर आणि अँटनानारिवो प्रांतांमध्ये पसरलेली आहे.अत्यंत वेगाने पसरलेल्या या ब्लॅक डेथ नावाने ओळखलेल्या साथीने मादागास्करची सीमा ओलांडून आग्नेय आफ्रिकेतील देशांमध्ये प्रवेश करण्याची भीती निर्माण झाली आहे.  

अॅंटानानारिवो- मादागास्करमध्ये गेले दोन दिवस पसरलेल्या प्लेगने 124 लोकांचे प्राण घेतले आहेत. चप्रमाणे मादागास्करमधील 1300 लोकांना प्लेगची लागण झाली आहे.  अत्यंत वेगाने पसरलेल्या या ब्लॅक डेथ नावाने ओळखलेल्या साथीने मादागास्करची सीमा ओलांडून आग्नेय आफ्रिकेतील देशांमध्ये प्रवेश करण्याची भीती निर्माण झाली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने हा प्लेग आता केनया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक,टांझानिया, मॉरिशस, ला रियुनियन, सेशेल्स आणि कोमोरोस येथे पसरण्याची भीती व्यक्त केली आहे.

प्लेगचे प्रकार आणि त्यापासून होणारा धोका-प्लेगचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे ब्युबॉनिक प्लेग. यामध्ये प्लेगचे जंतू किडे, किटकांच्या मार्फत प्रवास करतात आणि किडा मनुष्याला चावल्यानंतर त्या जंतूंचा मनुष्याच्या रक्तात प्रवेश होतो. त्यानंतर ही लागण वाढल्यानंतर मनुष्याच्या शरीरामध्ये प्लेगचे रुपांतर न्युमॉनिक प्लेगमध्ये रुपांतर होते. त्यामुळे त्याच्या खोकल्यातून ते जंतू बाहेर पडून त्याची लागण इतरांना होते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे स्पेशीकॅमिक प्लेग. हा प्लेग दुषित रक्ताच्या संक्रमणामुळे पसरतो. प्लेग झालेल्या व्यक्तीच्या अंगावर लसिका गाठी ( रक्तपेशी तसेच पातळ द्रवाच्या गाठी) तयार होतात. तसेच अत्यंत अशक्तपणा, ताप, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसतात. अंगावरील गाठी फुटल्यामुळे जखमा होणे, पस होणे असेही प्रकार दिसून येतात.मादागास्करच्या प्लेगचा इतिहास-28 ऑगस्ट रोजी मोरामंगा येथे या साथीतील पहिला मृत्यू नोंदवण्यात आला त्यानंतर प्लेगला बळी पडणा-या लोकांची संख्या वाढतच गेली. वास्तविक मादागास्कर बेटावर प्लेग हा रोग नवा नाही. दरवर्षी मादागास्करमध्ये प्लेगची 400 लोकांना लागण झालेले दिसून येते. मात्र ते सगळे ब्युबॉनिक प्लेगचे रुग्ण असतात, आता आलेली साथ ही न्युमॉनिक प्लेगची असून ती जास्त धोकादायक आहे. ही साथ पूर्व मादागास्कर आणि अँटनानारिवो प्रांतांमध्ये पसरलेली आहे.प्लेग जगातून नाहीसा झाला असे वाटत असतानाच आजही आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत प्लेगच्या साथी डोके वर काढत असतात. मादागास्करमध्ये भारतीय जहाजांतून 1898 साली प्लेग गेल्याचे सांगण्यात येते. प्लेगचे संक्रमण रोखण्यासाठी मादागास्करने चांगले प्रयत्न केले असले तरी 2004-2009 या काळात जगातील प्लेगबाधितांपैकी 30% रुग्ण मादागास्करमध्ये होते, असे एका निरीक्षणातून नोंदले गेले आहे. 

मादागास्करमध्ये प्लेगच्या साथीनं आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू

मादागास्करमधील अंत्यसंस्काराची पद्धत प्लेगचा प्रसार वेगाने करु शकते-मादागास्करमधील मालागासी जमातीमध्ये मेलेल्या व्यक्तीला कापडामध्ये गुंडाळून, खांद्यावर नाचवत अंत्यसंस्कारासाठी नेले जाते. यामध्ये आबालवृद्ध, महिला नृत्यही करतात. या प्रथेला फमादिहाना असे म्हटले जाते. पण प्लेगने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या आसपास प्लेगचे जंतू बराच काळ राहू शकतात. शेकडो लोकांनी अशाप्रकारे अंत्यसंस्कार केल्यास प्लेग अधिक वेगाने पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.भारतातला प्लेग- जगभरात प्लेगने आजवर अनेक देशांमध्ये थैमान घातले होते. भारतही प्लेगच्या तावडीतून सुटलेला नाही. 19 व्या शतकाच्या मध्यापासून चीनमध्ये प्लेगने हजारो लोकांचे प्राण घेतले होतेच. 1896 साली भारतामध्ये प्लेगचा प्रवेश झाला. 1894 साली हॉंगकॉंगमध्ये प्लेगचा उद्रेक झाला होता. तेथूनच हा प्लेग भारतात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पुढील 30 वर्षांमध्ये सव्वा कोटी लोकांचे प्राण या रोगाने घेतल्याचे सांगण्यात येते. मुंबई, पुणे, कोलकाता, कराची (आता पाकिस्तानात) अशा मोठ्या शहरांमध्ये प्लेगची साथ झपाट्याने पसरली. प्लेग आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी अत्यंत कठोर पद्धतींचा वापर केला आणि त्याच्या नावाखाली लोकांवर अत्याचार सुरु केले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी चापेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी वॉल्टर चार्ल्स रॅंडला गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली.