शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 19:41 IST

सिस्टर जिनने ज्या मुलासोबत लग्न केले, तो रशियाचा असून डेफू असे त्याचे नाव आहे. तो एक दिवस मित्रासोबत सिस्टर जिन यांच्या घरी जेवणासाठी गेला होता...

चीनमधील एक 50 वर्षीय व्यवसायिक महिला, आपल्याच मुलाच्या वर्गात शिकत असलेल्या, त्याच्या मित्राच्या प्रेमात पडली. तिने त्या मुलासोबत लग्नही केले. यानंतर आता, आपण गर्भवती असल्याचा दावाही या महिलेने केला आहे. सिस्टर जिन, असे या महिलेचे नाव आहे. तिने स्वतःच सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर लोकांच्या विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत.

असं फुलत गेलं प्रेम... -सिस्टर जिनने ज्या मुलासोबत लग्न केले, तो रशियाचा असून डेफू असे त्याचे नाव आहे. तो एक दिवस मित्रासोबत सिस्टर जिन यांच्या घरी जेवणासाठी गेला होता. डेफू अस्खलित चिनी भाषा बोलत होता. त्याने त्याच्या मित्राच्या आईने बनवलेल्या पदार्थांचेही तोंडभरून कौतुक केले. तो साधारणपणे आठवडाभर त्याच्या मित्राकडेच राहिला. याच काळात सिस्टर जिन आणि डेफू यांच्यात जवळिक निर्माण झाली. त्यांचे प्रेम एवढे फुलले की, त्यांनी लग्न केले.

सोशल मीडियावर शेअर केले आहेत व्हिडिओ - सिस्टर जिनने आपल्या परदेशी पतीसोबतचे अनेक व्हिडिओ आणि रपोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जिनने सांगितले की, आपण तीस वर्षांचे असतानाच आपला घटस्फोट झाला होता. यानंतर आपण एकट्यानेच आपल्या मुलाचा सांभाळ केला. आता या वयात त्यांना पुन्हा एकदा प्रेम मिळाले आहे...

सिस्टर जिनने सोशल मीडियावर तिच्या परदेशी पतीसोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. जिनने सांगितले की तिचा वयाच्या ३० व्या वर्षी घटस्फोट झाला. त्यानंतर तिने तिच्या मुलाला एकट्याने वाढवले. आता या वयात तिला पुन्हा एकदा तिचे प्रेम सापडले आहे.

सिस्टर जिनच्या मुलाला त्यांच्या प्रेमाबद्दल समजल्यनंतर, त्यानेही याचे समर्थन केले. सिस्टर जिन यांना सुरुवातीला लग्नासंदर्भात संकोच वाटत होता. त्या म्हणाल्या, दोघांमधील वयातील अंतरही मोठे आहे. त्यांच्या उंचितही फार फरक आहे. याशिवाय, त्या त्यांच्या पहिल्या लग्नाच्या अनुभवामुळेबी भीत होत्या. मात्र त्यांच्या मुलाच्या पाठिंब्याने त्यांनी लग्न केले. यानंतर आता त्या डेफूच्या मुलालाही जन्म देणार आहेत.

सोशल मीडियावर या लव्ह स्टोरीसंदर्भात वेगवेगळी मते आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ही लव्हस्टोर मुद्दामहून लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तर आणखी एका म्हटले आहे की, यांच्या लव्ह स्टोरीचे भविष्यात काय होणार हे वेळच ठरवेल.

 

 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नchinaचीन