प्रेमात पाडणारी गालावरची खळी
By Admin | Updated: April 15, 2016 14:47 IST2016-04-15T14:47:31+5:302016-04-15T14:47:31+5:30
गालावरची खळी सौदर्य खुलवते. विशेषकरुन तरुणी गालावरच्या खळीमुळे अधिक सुंदर दिसतात आणि ही खळीच त्यांची ओळखही बनून जाते.

प्रेमात पाडणारी गालावरची खळी
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १५ - गालावरची खळी सौदर्य खुलवते. विशेषकरुन तरुणी गालावरच्या खळीमुळे अधिक सुंदर दिसतात आणि ही खळीच त्यांची ओळखही बनून जाते. उदहारणार्थ प्रिती झिंटा. प्रिती तिच्या सौदर्याबरोबर लक्षात रहाते ती तिच्या गालावरच्या खळीमुळे.
हसताना चेह-यावरचे स्नायू आत खेचले गेल्यामुळे ही सुंदर खळी तयार होते.
बहुतांश व्यक्तींना ही खळी जीन्समधल्या अनुवंवशिकतेतून मिळते तर, काहीवेळा अतिरिक्त चरबीमुळे ही खळी तयार होते. शरीरातील चरबीमुळे तयार होणारी खळी चरबी कमी झाल्यानंतर आपोआप लोप पावते.
शारीरीक वैशिष्ट्यांबरोबर खळीचा ज्योतिष शास्त्राशीही संबंध आहे. पुराणामध्ये खळी असणा-या तरुणीचे वैवाहिक आयुष्य सुख, समाधान आणि आनंदाने भरलेले असते असे म्हटले आहे. गालावर खळी असणा-या तरुणी मोकळया मनाच्या, बिनधास्त आयुष्य जगण्याला प्राधान्य देणा-या असतात. रडत-खडत जगण्यापेक्षा आनंदात आयुष्य जगण्याचा त्यांचा स्वभाव असतो.