शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच, २ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:24 IST

Los Angeles wildfires : या भीषण आगीमुळे ३ दिवसांत २८ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Los Angeles wildfires :  अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच आहे. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग आता अधिक तीव्र झाली आहे. या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉस एंजेलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे घर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी लागलेली आग हॉलिवूडसाठीही हे मोठे नुकसान करुन गेली आहे. या भीषण आगीमुळे ३ दिवसांत २८ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

भीषण आगीमुळे पॅरिस हिल्टनसह अनेक कलाकारांचे बंगले जळून खाक झाले आहेत आणि एक लाखाहून अधिक लोक आपली घरे सोडून गेले आहेत. दरम्यान, कॅलिफोर्नियातील आग दर तासाला एका नवीन भागाला वेढत आहे. जोरदार वाऱ्यांमुळे आगीने आग आणि वादळाचे रूप धारण केले आहे. आगीमुळे, हॉलिवूड हिल्सवरील अमेरिकन चित्रपट उद्योगाची ओळख असलेल्या हॉलिवूड बोर्डला जळून खाक होण्याचा धोका आहे.

हॉलिवूड हिल्समधील जगातील अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या स्टुडिओना आग लागली आहे. यामध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सच्या घरांचाही समावेश आहे. ५ भागात पसरलेली ही आग अजूनही भीषण आहे. काही भागात आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधून पाणी फवारले जात आहे. 

कॅलिफोर्नियातील आगीमुळे झालेल्या विध्वंसामुळे १ लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. ४ लाख घरांमध्ये वीज संकट आहे. २० हजार एकरमध्ये पसरलेल्या या आगीमुळे ६०,००० इमारती धोक्यात आल्या आहेत. या आगीमुळे जवळपास ५७ अरब डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीची भीषणता दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये आगीने संपूर्ण परिसर खाक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाfireआगInternationalआंतरराष्ट्रीयHollywoodहॉलिवूड