दिसतो भिकाऱ्यासारखा... खरेदी केली हार्ले डेविडसन

By Admin | Updated: May 26, 2017 01:06 IST2017-05-26T01:06:42+5:302017-05-26T01:06:42+5:30

असे म्हणतात की, एखाद्याच्या कपड्यावरून त्याची ‘औकात’ काढली जाऊ नये. थायलंडमधील एका व्यक्तीच्या बाबतीत काहीसे असेच झाले.

Looks like begging ... Harley Davidson bought | दिसतो भिकाऱ्यासारखा... खरेदी केली हार्ले डेविडसन

दिसतो भिकाऱ्यासारखा... खरेदी केली हार्ले डेविडसन

बँकॉक : असे म्हणतात की, एखाद्याच्या कपड्यावरून त्याची ‘औकात’ काढली जाऊ नये. थायलंडमधील एका व्यक्तीच्या बाबतीत काहीसे असेच झाले. फाटके कपडे असलेला हा व्यक्ती थायलंडमधील सिंग बुरी भागात मॅक्सिंगबुरीबाइक नावाच्या शोरूममध्ये गेला. प्रत्येकाला वाटले की, हा भिकारीच आहे. आपल्याला हार्ले डेविडसन बाइक खरेदी करायची आहे असे त्याने सांगताच येथील लोक हसू लागले आणि त्याची थट्टा करू लागले. सेल्समनही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. त्यानंतर संतापलेल्या या व्यक्तीने शोरूमच्या मालकाला बोलावून घेतले. दहा मिनिटांच्या चर्चेनंतर मालकाने त्यांना हार्ले डेविडसन बाइक दाखविली. या व्यक्तीने तत्काळ १२ लाख रुपये कॅश त्या मालकाच्या हातावर ठेवले. यावेळी उपस्थित लोक चकीत होऊन हा प्रकार पाहत होते. काही जणांनी त्याचे फोटो काढून फेसबुकवर पोस्ट केले आणि ही माहिती व्हायरल झाली. या व्यक्तीच्या बहिणीने या फोटोवरून त्याला ओळखले आहे.

Web Title: Looks like begging ... Harley Davidson bought