लाखात देखणी... चिनी विद्यार्थ्याने बनविली सुपर कार
By Admin | Updated: July 23, 2015 00:01 IST2015-07-23T00:01:08+5:302015-07-23T00:01:08+5:30
कारचा छंद असलेल्या चिनी विद्यार्थ्याने तयार केलेली सुपरकार तिच्या आकर्षक ‘लूक’मुळे चीनमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. तीन हजार डॉलर खर्चून तयार

लाखात देखणी... चिनी विद्यार्थ्याने बनविली सुपर कार
कारचा छंद असलेल्या चिनी विद्यार्थ्याने तयार केलेली सुपरकार तिच्या आकर्षक ‘लूक’मुळे चीनमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. तीन हजार डॉलर खर्चून तयार झालेली ही इलेक्ट्रिक कार हेनान येथील कार महोत्सवात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. ३७ कि.मी. प्रतितास एवढा कमाल वेग असलेल्या या कारला रस्त्यावर धावण्याचा परवाना अद्याप मिळालेला नाही. या कारचा केवळ लूकच हॉलीवूड चित्रपटाला शोभेल असा नाही तर तिची अंतर्गत सजावटही हॉलीवूडच्याच तोडीची आहे.
कारचा छंद असलेल्या चेन जिंक्शी या २७ वर्षीय तरुणाने सहा महिने परिश्रम करून आपल्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणली. हेनान प्रांताची राजधानी हाईकू येथील कार महोत्सवात चेनला त्याची कार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर लोकांचे लक्ष त्याच्या कामाकडे गेले. २०१५ चे हेनान आंतरराष्ट्रीय वाहन उद्योग प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या आगंतुकांना चेनच्या कारने चांगलीच भुरळ घातली होती.