शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

लंडन दुर्घटना- जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून लोकांनी मारल्या उडया

By admin | Updated: June 14, 2017 12:49 IST

ग्रेनफेल टॉवरला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर काही रहिवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांमधून उडया मारल्या.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 14 - ग्रेनफेल टॉवरला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर काही रहिवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांमधून उडया मारल्या असे या इमारतीत राहणा-या अयुब असीफने सीएनएन वृत्तवाहिनीला सांगितले. टॉवरमध्ये अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी आपण बचाव पथकाच्या कर्मचा-यांना मदत केली असे अयुबने सांगितले. अयुबचा भाचा आणि चुलत भाऊ या आगीत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
आपणही काही रहिवाशांना इमारतीमधून उडया मारताना पाहिले असे ओमर चौधरी याने सांगितले. आगीच्या ज्वाळांमधून सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी उडया मारल्या असे ओमर चौधरी म्हणाला. टॉवरचे सर्व 27 मजले आगीने वेढले असून, तुम्हाला दूरवर उभे राहिल्यानंतरही आग आणि धुराचे लोळ तुम्हाला दिसतील असे ओमर चौधरी म्हणाला. अग्निशामक दलाच्या चाळीस गाड्या आणि 200 जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
गेल्या तीन ते चार तासांपासून सुरू असलेल्या आगीमुळे इमारतीचा एक भाग जळून खाक झाला आहे.  तसंच आगीमुळे ही इमारत एका बाजूला झुकली गेली आहे. त्यामुळे ही इमारत कधीही पडू शकते, अशीही माहिती समोर येते आहे. रहिवासी परिसर असल्याने इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. डन फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार, सुरूवातील दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. नंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली.  
 
आणखी वाचा
 
"मी स्वयंपाक घरात असताना फायर अलार्म ऐकु आला. बाहेर पाहिल्यावर इमारतीचा उजवा भाग जळताना मला दिसला", अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने स्काय न्यूजला दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पश्मिम लंडनमधील लॅटिमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेट परिसरात ही इमारत आहे..  पोलिसांच्या माहितीनुसार आत्तापर्यत दोन जण जखमी झाले आहेत. 
 
लंडन अॅम्ब्युलन्स सेवेला रात्री 1.30 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी 20 अॅम्ब्युलन्स तात्काळ घटनास्थळी पाठवल्या. गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत.  लंडनमधील अॅम्ब्युलन्स सेवेने ग्रेनफेल टॉवरच्या आसपासच्या इमारतीत रहाणा-या रहिवाशांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद करुन घेण्यास सांगितले आहे. कारण धुराच्या लोटामुळे त्रास होऊ शकतो.