शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

सिंगापूरमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 9:00 AM

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मान्यवरांमुळे कन्व्हेन्शन ठरणार वैविध्यपूर्ण; जागतिक आर्थिक विकासाबाबत मांडली जाणार तज्ज्ञांकडून अभ्यासपूर्ण मते 

सिंगापूर : सर्वच क्षेत्रांतील आश्वासक वाटचालींमुळे आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू पाहत आहे. आतापर्यंतच्या वाटचालीचा सकारात्मक आढावा घेऊन भविष्यात अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्यासंदर्भात सर्वंकष चर्चा व्हावी आणि विविध क्षेत्रांतील वेगवान प्रगतीसाठी निश्चित धोरण ठरावे, या हेतूने जागतिक पातळीवरील क्रमांक एकचे मराठी वृत्तपत्र ही चर्चा घडवून आणत आहे. सिंगापूरमधील पंचतारांकित विश्वविख्यात हॉटेल शांग्रिलामध्ये ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ २८ मार्चला स. १० ते रात्री ८ या वेळेत हाेत आहे. 

इंट्रिया ज्वेल्स, न्याती ग्रुप आणि G2 स्नॅक्सच्या सहयोगाने आयोजित या दिवसभर चालणाऱ्या कॉन्क्लेव्हमध्ये कार्यकर्तृत्वातून वेगळेपण सिद्ध करणारे विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था, बँकिंग, शाश्वत विकासाचा सांस्कृतिक वारसा, पायाभूत सुविधा, पर्यटन आदी विषयांवर सखोल मंथन होणार आहे. फक्त अर्थव्यवस्था हा विषय न घेता स्टेम सेल्स, टेक्सटाइल, फार्मास्युटिकल्स, हॉस्पिटॅलिटी अशा विषयांचाही या कन्व्हेन्शनमध्ये अभ्यासपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्यांच्या कामामुळे अनेकांचे आयुष्य बदलले अशा मान्यवरांना लोकमत सन्मानित करणार आहे. ‘लोकमत ग्लोबल ट्रेलब्रेझर अवॉर्ड’, ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवॉर्ड’ आणि जागतिक पातळीवर काम करणाऱ्या मरुधरांचा या वेळी सन्मान करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाला जैन आध्यात्मिक गुरु लोकेश मुनीजी,  राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, रेमण्ड उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया, बँकर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या  अमृता फडणवीस, वेलस्पन ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली गोयंका, सेलो वर्ल्डचे चेअरमन व न्यू एज बिलियनर प्रदीप राठोड, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया, सॉलिटेयर ग्रुपचे संचालक प्रमोद रांका, सुप्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा, ख्यातनाम लेखिका आणि एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका स्वाती लोढा, नोबेल कास्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन नितीन भागवत, इन्स्पिरा एन्टरप्राइजचे संस्थापक प्रकाश जैन, मोहन मुथा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश मुथा, पोकर्ण ग्रुपचे अध्यक्ष गौतमचंद जैन, अजंता फार्माचे उपाध्यक्ष मधुसूदन अगरवाल, पगारिया ग्रुपचे संस्थापक उज्ज्वलकुमार पगारिया, बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल मेडिसीन स्पेशालिस्ट डॉ. गौतम भन्साली, भारताचे गोल्डमॅन व रिद्धीसिद्धी बुलियन्सचे संस्थापक पृथ्वीराज कोठारी, संस्थापक - नवमी हॉटेल्सचे सूर्या व रितू झुंझुनूवाला, एआय तंत्रज्ञानातील अग्रणी कृष्णन भास्करन, पगारिया ग्रुपचे संचालक उज्ज्वल पगारिया, ऑप्टिमम सोल्युशन्सचे संस्थापक बलवंत जैन, तिरुपती बालाजी देवस्थान बाेर्डच्या विश्वस्त सपना सुधीर मुनगंटीवार, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगल प्रभात लोढा, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत या कन्व्हेन्शनला संबोधित करणार आहेत. या कॉनक्लेव्हचे अध्यक्षपद लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा हे भूषविणार आहेत. विविध विषयांना वाहिलेली आंतरराष्ट्रीय शिखर परिषद पहिल्यांदाच होत आहे. या कार्यक्रमाचे टीव्ही पार्टनर एनडी टीव्ही इंडिया हे आहेत.

मरुधरांच्या कुटुंबांचा जागतिक पटलावर सन्मान - कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डाराजस्थान या मरुभूमीतून गरुडझेप घेत राज्याबाहेर आणि देशाबाहेर भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी लोकमत मरुधर सन्मानाचे प्रयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, या सोहळ्यात व्यक्तीसोबत त्यांच्या कुटुंबाचा सन्मान होणार आहे. या सन्मानासाठी लोकांचा भिन्न क्षेत्रांमधून उदंड प्रतिसाद मिळाला. या पुरस्कारासाठी लोकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्या शेकडो प्रवेशिकांमधून मोजक्या प्रवेशिकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्काराचा लोकमत मरुधर सन्मानाचा दिमाखदार समारंभही या कन्व्हेन्शनच्या दरम्यान सकाळच्या सत्रात रंगणार आहे. मरुधर सन्मानाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व्यक्तींच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या समितीद्वारे या पुरस्कारासाठी अंतिम नावांची निवड करण्यात आली आहे. 

‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवॉर्ड’ने होणार स्त्रीशक्तीचा गौरव - पूर्वा दर्डा-कोठारीमहिलांच्या योगदाना-शिवाय जगाचा गाडा चालूच शकत नाही. त्यांच्यामुळे जागतिक पातळीवर अनेक महत्त्वाचे बदल घडले आहेत. देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या विकासात महिलांचा वाटा मोठा आहे. या नारीशक्तीचा जागतिक स्तरावर सन्मान व्हावा, यासाठी ‘लोकमत’ने कायमच पुढाकार घेतला आहे. विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य करून संपूर्ण जगात नाव कमावलेल्या महिलांना ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. ‘इंट्रिया ज्वेल्स’ या सोहळ्याचे प्रेझेंटिंग पार्टनर असून  इंट्रियाच्या संचालक आणि सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी या वेळी उपस्थित असणार आहेत. 

हटके काम करणाऱ्यांची जागतिक पातळीवर दखल समाजातील सकारात्मक उपक्रमांना बळ देणाऱ्या ‘लोकमत’कडून सातत्याने विधायक उपक्रम राबवले जातात. त्यामुळेच या उपक्रमात ‘लोकमत’सोबत सहभागी होता येत असल्याचा आनंद आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मध्ये होणार आहे. त्यामुळे वेगळे काम करणाऱ्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे. यातून मान्यवरांचे काम आणि त्यातून झालेले शाश्वत बदल समाजासमोर येणार आहेत. सन्मानार्थीचा त्यांच्या क्षेत्रातील प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला तळागाळापर्यंत पोहाेचवण्याचे काम या उपक्रमातून होणार आहे.    - नितीन न्याती, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, न्याती ग्रुप

टॅग्स :singaporeसिंगापूरLokmat Eventलोकमत इव्हेंट