शहरं
Join us  
Trending Stories
1
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
2
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
3
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
4
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
5
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
6
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
7
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
8
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
9
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
10
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
11
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
12
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
13
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
14
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
16
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
17
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
18
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
19
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
20
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मोठी बातमी; अखेर ७६ दिवसांनंतर चीननं घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 09:07 IST

CoronaVirus कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वुहानमधील परिस्थिती नियंत्रणात

वुहान: सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. मात्र चीनमधील परिस्थितीत सुधारणा होत आहे. कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधून जगभरात पसरला. वुहानमध्ये कोरोनानं शेकडो जणांचे बळी घेतले. पण आता वुहान पूर्वपदावर आलं असून तिथलं लॉकडाऊनदेखील हटवण्यात आलं आहे. गेल्या ७६ दिवसांपासून वुहानमध्ये लॉकडाऊन सुरू होतं. मात्र आता वुहानमधील नागरिकांना मोकळा श्वास घेता घेणार आहे.कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन २३ जानेवारीला वुहान शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वुहानची लोकसंख्या १ कोटी १० लाख इतकी आहे. वुहानमधून चीनच्या विविध भागांत कोरोनाचा विषाणू पसरला. चीनमध्ये कोरोनामुळे ३ हजार ३०० पेक्षा अधिक जणांचा बळी गेला. तर ८२ हजार जणांना बाधा झाली. चीन सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगानं घट झाली आहे. मंगळवारी (काल) चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही.कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं वुहानमधील लॉकडाऊन हटवण्यात आलं असून नागरिकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी फक्त अत्यावश्यक कामांसाठीच वुहानमधल्या नागरिकांना घराबाहेर पडता येत होतं. याशिवाय शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या होत्या.लॉकडाऊन संपल्यानं शहरातल्या यांग्त्जी नदीच्या किनाऱ्यावर एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आणि कोरोनाचे रुग्ण यांची ऍनिमेटेड चित्रं साकारण्यात आली होती. लॉकडाऊन हटवण्याआधी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील रेल्वे स्थानकं आणि विमानतळाचा आढावा घेतला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या