शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Lockdown News: लॉकडाऊनचा प्रचंड फटका; अमेरिकेतील खाजगी क्षेत्रात २०.२ दशलक्ष रोजगार कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 07:08 IST

महामंदीपेक्षाही अधिक नोकर कपात; आकडेवारी अजूनही अपूर्ण

वॉशिंग्टन : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील खाजगी क्षेत्राने एप्रिलमध्ये तब्बल २0.२ दशलक्ष रोजगार कपात केली आहे. एका पेरोल डाटा कंपनीने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग’(एडीपी) अहवालात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये अमेरिकेतील सेवादाता उद्योगाने १६,00७,000 लोकांना कामावरून कमी केले आहे. वस्तू उत्पादन क्षेत्राने ४,२२९,000 रोजगारांत कपात केली आहे. मोठ्या कंपन्यांनी ८,९६३,000 कामगारांना काढले आहे. मध्यम कंपन्यांनी ५,२६९,000 कामगारांना, तर छोट्या उद्योगांनी ६,00५,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

‘एडीपी रिसर्च इन्स्टिट्यूट’चे सहअध्यक्ष आहू यिल्डिर्माझ यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या संख्येने नोकºया गमावणे ही अभूतपूर्व घटना आहे. महामंदीच्या संपूर्ण काळात जेवढे रोजगार गेले त्याच्या कितीतरी पट अधिक रोजगार यंदा एकट्या एप्रिल महिन्यात गेले आहेत.विशेष म्हणजे ही आकडेवारी परिपूर्ण नाही. कोविड-१९ मुळे गेलेल्या सर्व नोकऱ्यांचा यात समावेश नाही. ही आकडेवारी केवळ कंपन्यांच्या ‘पेरोल’वर असलेल्या कर्मचाºयांचीच आहे. प्रत्यक्ष आकडा यापेक्षा किती तरी मोठा असणार आहे. दरम्यान, अमेरिकी सरकारकडून जारी होणार असलेला रोजगारविषयक अहवालही भीषण असण्याची शक्यता आहे. सात दशकांपूर्वी मासिक रोजगार स्थिती जारी करण्यास अमेरिकेत सुरुवात झाली होती. एप्रिलमधील रोजगाराची स्थिती या संपूर्ण काळातील सर्वात वाईट असण्याची शक्यता आहे.

मागील सहा आठवड्यांत अमेरिकेतील ३0 दशलक्षापेक्षा जास्त लोकांनी बेरोजगारी लाभासाठी अर्ज केले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात सुरू केली आहे.‘आयुष्यात कधीही पाहिली नाही अशी स्थिती’सेंट्रल रिझर्व्ह बँक आॅफ शिकागोच्या एका अर्थतज्ज्ञाने सांगितले की, एप्रिलमधील वास्तविक बेरोजगारीचा दर २५.१ टक्के ते ३४.६ टक्के यादरम्यान राहण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हचे उपाध्यक्ष रिचर्ड क्लॅरिडा यांनी सांगितले की, बेरोजगारीचा दर १९४0 पेक्षाही वाईट पातळीवर जाऊ शकतो. कोविड-१९ च्या साथीमुळे अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात घसरली आहे. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आपण आपल्या आयुष्यात कधीही पाहिलेले नाही, अशा स्वरूपाच्या बेरोजगारीचा आणि आर्थिक घसरणीचा सामना करीत आहोत.

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी